Kannada Remark Controversy: मुख्यमंत्र्यांच्या 'कानडी' वक्तव्यावरुन कुठ्ठाळीत रणकंदन; भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप! मारियानो रॉड्रिग्ज आक्रमक

CM pramod sawant kannada remark controversy: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कानडी वक्तव्यावरून कुठ्ठाळी मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
CM pramod sawant kannada remark controversy
CM pramod sawant kannada remark controversyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

वास्को: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कानडी वक्तव्यावरून कुठ्ठाळी मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते मारियानो रॉड्रिग्ज यांनी भाजपने कन्नड भाषिक मतदारांविषयीची भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान दिले. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपने मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही भाषेचा अपमान केला नसल्याचा दावा केला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी झुआरीनगर येथील सभेत कन्नड आणि इंग्रजीत भाषण केले होते. त्यानंतर कुठ्ठाळीतील भाजप कार्यालयाच्या उद्घाटनावेळी सावंत यांनी कानडी भाषेचा उल्लेख केल्यावर वाद निर्माण झाला. सर्व भारतीय भाषा आणि नागरिकांचा सन्मान राखणे मुख्यमंत्र्यांना आवश्यक असल्याचे रॉड्रिग्ज म्हणाले. भाजपला कुठ्ठाळीतील कन्नड मतदारांची मते नको आहेत का, असा सवाल करत त्यांनी मतदारसंघात दहा वर्षांत विकास झाला नसल्याचाही आरोप केला.

CM pramod sawant kannada remark controversy
CM Pramod Sawant Meeting: समन्वयातून राज्यातील प्रलंबित प्रश्न सोडवा; मुख्यमंत्र्यांचे वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत निर्देश

भाजपचे (BJP) राज्य सचिव दीपक नाईक यांनी हे आरोप फेटाळले. विरोधक मुख्यमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप करीत असल्याचे ते म्हणाले. जिल्हा पंचायत सदस्य सुनील गावस यांनीही सावंत यांची बाजू घेतली, तर भाजप उपाध्यक्ष जयंत जाधव यांनी शिवकुमार यांच्या गोवा दौऱ्यावर टीका केली. त्यामुळे भाषिक अस्मितेवरून कुठ्ठाळीतील राजकीय वातावरण तापले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

goa cm pramod sawant peons warning
Rahul Gandhi rally parking space controversy
Goa BJP Mahila Morcha Protest
Goa Politics
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com