CM Pramod Sawant Meeting: समन्वयातून राज्यातील प्रलंबित प्रश्न सोडवा; मुख्यमंत्र्यांचे वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत निर्देश

Pramod Sawant Meeting Central Officials: गोव्याशी संबंधित प्रलंबित प्रश्नांच्या तातडीने निवारणासाठी केंद्र सरकारच्या विविध विभागांशी प्रभावी समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी मंत्रालयात वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
Pramod Sawant Meeting Central Officials
CM Pramod Sawant MeetingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याशी संबंधित प्रलंबित प्रश्नांच्या तातडीने निवारणासाठी केंद्र सरकारच्या विविध विभागांशी प्रभावी समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी मंत्रालयात वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. केंद्र व राज्यातील विभागांमध्ये समन्वय वाढवून प्रश्न वेळेत मार्गी लावण्यावर भर देण्यात आला.

केंद्राच्या विविध यंत्रणांशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. प्रलंबित विषयांवर राज्यातील संबंधित विभागांनी नियमित समन्वय साधून कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करावी, असे निर्देश डॉ. सावंत यांनी दिले. प्रकल्पांच्या अंमलबजावणीत केंद्र-राज्य यंत्रणांमध्ये समन्वय राहावा आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे कामे रखडू नयेत, यासाठी सहकार्य वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Pramod Sawant Meeting Central Officials
Goa Land Grabbing Case: जमीन हडप प्रकरणी स्पेशल कोर्टाला घटनात्मक आव्हान; गोवा सरकारला हायकोर्टाची नोटीस, आरोप निश्चितीला स्थगिती

अधिक सक्रियपणे पाठपुरावा करावा!

गोव्याच्या विकासाशी संबंधित महत्त्वाचे प्रकल्प आणि विविध विभागांच्या प्रलंबित प्रश्नांच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या यंत्रणांशी सुरळीत समन्वय राखण्यास राज्य सरकार कटिबद्ध असून केंद्राशी संबंधित विषयांवर जलद निर्णय आणि आवश्यक कार्यवाही करण्यासाठी राज्यातील विभागांनी अधिक सक्रियपणे पाठपुरावा करावा, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com