Sattari Congress : सत्तरीचा विकास काँग्रेस पक्षामुळेच! प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर

Sattari Congress : हाेंडा येथील श्री आजाेबा वडदेव देवस्थान तसेच वाळपई येथील श्री हनुमान मंदिर व मासाेर्डे येथील श्री शांतादुर्गा रवळनाथ देवीचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. यावेळी हळदाेणेचे आमदार कार्लोस परेरा यांची उपस्थिती होती.
Sattari Congress
Sattari Congress Dainik Gomantak
Published on
Updated on

Sattari Congress :

वाळपई, पर्ये व वाळपईत काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांना चांगला पाठिंबा मिळत आहे. सत्तरी तालुक्यात जाे विकास झाला आहे, ताे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने केला आहे.

त्यामुळे सत्तरीची जनता ही काँग्रेससोबत राहणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.

उत्तर गोवा काँग्रेस उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी आज पर्ये व वाळपई मतदारसंघात प्रचार दौरा करून प्रचाराला सुरुवात केली. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाटकर बोलत होते.

Sattari Congress
Goa Made Liquor Seized: पत्रादेवी येथे पकडली लाखोंची दारू; बेकायदा वाहतूक

हाेंडा येथील श्री आजाेबा वडदेव देवस्थान तसेच वाळपई येथील श्री हनुमान मंदिर व मासाेर्डे येथील श्री शांतादुर्गा रवळनाथ देवीचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. यावेळी हळदाेणेचे आमदार कार्लोस परेरा यांची उपस्थिती होती.

आपण केंद्रीय मंत्री असताना गाेव्याचे तसेच सत्तरीचे अनेक प्रश्न मांडले आहेत. सत्तरीचा सर्वांगीण विकास हा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनीच केला आहे. भाजपने सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले आहे. यावेळी भाजपचा पराभव न केल्यास सामान्यांचे जगणे कठीण होणार आहे.

-रमाकांत खलप, काँग्रेस उमेदवार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com