Goa Congress: काँग्रेसच्या मनीषा, शमिला निलंबित; पक्षातर्फे कारवाई, पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका

goa congress suspension: मनीषा उसगावकर व शमिला सिद्दीकी यांना पक्षविरोधी भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाने सोमवारी निलंबित केले, अशी माहिती प्रदेश समितीच्या मीडिया विभागाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी दिली.
goa congress suspension
goa congress suspensionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा प्रदेश काँग्रेसच्या माजी सरचिटणीस मनीषा उसगावकर व समाजमाध्यम विभागाच्या समन्वयक शमिला सिद्दीकी यांना पक्षविरोधी भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाने सोमवारी निलंबित केले, अशी माहिती प्रदेश समितीच्या मीडिया विभागाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी दिली.

दरम्यान, दोघींनाही आपापली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार असल्याचे पक्षातर्फे सांगितले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर व संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्यानंतर उसगावकर आणि सिद्दीकी यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती आणि माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचे कौतुक केले होते.

दोघीही पाटकर गटाच्या समर्थक समजल्या जातात. पाटकर यांना का हटविले म्हणून त्यांनी प्रश्न विचारले, त्याशिवाय पदाचा त्याग केला होता. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर कारवाई केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.

goa congress suspension
Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

दरम्यान, यावर उसगावकर यांच्याशी ‘गोमन्तक’ने संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, आपण दिवसभर कारापूरवासीयांच्या आंदोलनात पणजीत होते. आपल्याला घरी पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यमांतून पक्षाने निलंबित केल्याची माहिती मिळाली. परंतु पक्षाने आपल्याला तसे काही कळविलेले नाही.

समितीचे मीडिया विभागाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी दोन्ही महिला नेत्यांना त्यांची बाजू मांडण्यास संधी दिली जाईल, असे सांगितले; परंतु प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची यावर प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

आपली भूमिका रास्तच!

आपण जी भूमिका घेतली ती रास्तच होती. आपण जे प्रश्न उपस्थित केले, त्याची उत्तरे का दिली जात नाहीत. जर शिस्तपालनाचा विषय म्हणत असाल, तर एका बाजूला आंदोलनात पक्षाचे नेते असतात, तर दुसरीकडे पक्षाचे आमदार सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांच्या घरी जातात, त्यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार आहे? जेव्हा आम्ही पदाचा राजीनामा दिला तेव्हाच आम्हाला विचारणा का केली नाही? असा प्रश्न मनीषा उसगावकर यांनी उपस्थित केला.

goa congress suspension
Goa Accident Death: महाखाजन-धारगळ येथे भीषण अपघात, ट्रकची दुचाकीला मागून धडक; एक दाम्‍पत्‍य ठार

‘अन्याय’ कसा करू शकता?

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे महिला सक्षमीकरण, महिलांचे नेतृत्व आणि अल्पसंख्याक सक्षमीकरण याबाबत मांडतात त्या विचारांचा मला आदर वाटतो; परंतु काँग्रेसमध्ये मात्र प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. सत्तेसमोर सत्य बोलल्याबद्दल आम्हाला निलंबित केले जाते. मनीषा आणि मी आमचा असहमती दर्शवण्याचा लोकशाही अधिकार वापरला आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला! जेव्हा आमचा पक्ष ‘न्याया’ची भाषा करतो, तेव्हा तोच पक्ष ‘अन्याय’ कसा करू शकतो? असा सवाल शमिला सिद्दीकी यांनी ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवरून विचारला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com