Goa Congress : राहुल यांच्या समर्थनार्थ ‘मौन सत्याग्रह'
Goa Congress holds 'maun satyagraha' protest : राहुल गांधी यांच्यावर षडयंत्र करून मोदी आडनाव बदनामी प्रकरणी लोकसभेमधून अपात्र ठरविल्याच्या विरोधात आणि गांधी यांच्या समर्थनार्थ गोवा प्रदेश काँग्रेसने आज पणजीच्या आझाद मैदानावर तोंडावर काळी पट्टी बांधून मौन सत्याग्रह केला.
यात प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार ॲड कार्लुस फेरेरा, एलवीस गोम्स यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाटकर म्हणाले, लोकसभेमध्ये आमचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अदानी यांच्यामधील कथित संबंध उघड केले, म्हणून षडयंत्र रचून जुन्या खोट्याप्रकरणी अपात्र ठरवले आहे.
तरीही गोवा कॉंग्रेस गांधी यांच्या सोबत आहे. गांधी यांना समर्थन दर्शवण्यासाठी आम्ही मौन सत्याग्रह करीत आहोत. आपला लढा यापुढेही चालू राहील. राज्यातही सत्ताधारी भाजप सरकार सामान्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी सामान्यांवर अन्याय करण्याचे धोरण राबवत आहे.
थ्री लिनियर, डबल ट्रेकिंग प्रकल्प त्याचाच एक भाग आहे. दुपदरीकरणाचा मार्ग हाही अदानी यांच्या प्रकल्पांना मदत करण्यासाठीच राज्यात राबवला जात आहे, असा आरोप ही पाटकर केला.
पाटकर पुढे म्हणाले की, भाजपच्या राजवटीत काहीही चांगले घडत नाही. गोव्यात काँग्रेसच्या आमदारांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा भाजपने आमच्या आमदारांना वस्तूंप्रमाणे खरेदी केले आणि ईडी तसेच सीबीआयसारख्या केंद्रीय एजन्सीचा वापर करून त्यांच्यावर दबाव आणला. सत्तेत राहण्यासाठी आणि सत्ता बळकावण्याची भाजप ही पद्धत वापरत आहे, असे पाटकर म्हणाले.
यावेळी उपाध्यक्ष एम. के. शेख, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, ज्येष्ठ नेते शंभू बांदेकर, महिला अध्यक्ष बीना नाईक, अमरनाथ पणजीकर, सुभाष फळदेसाई, तुलिओ डिसूझा, एव्हर्सन वालेस, ऑर्विल दोरादो,
विरिएटो फर्नांडिस, वीरेंद्र शिरोडकर, सावियो डीसिल्वा, मोरेन रिबेलो,वरद म्हार्दोळकर, नौशाद चौधरी, विवेक डिसिल्वा, जयदेव प्रभुगावकर, नियाजी शेख आदी उपस्थित होते.
लोकशाहीची हत्या
पाटकर म्हणाले, राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ देशभरात ‘मौन सत्याग्रह’ करण्यात येत आहे. भाजप सरकारने देशातील लोकशाहीची हत्या केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या कृत्यांचा राहुल यांनी पर्दाफाश केल्यानेच त्यांना संसदेतून अपात्र केल्याचे स्पष्ट झाले आहे.
राहुल सामान्य माणसाच्या हितासाठी काम करत आहेत आणि म्हणूनच त्यांच्या भारत जोडो यात्रेत लोकांनी त्यांचे स्वागत केले. भाजपला त्यांच्या लोकप्रियतेची भीती वाटत होती आणि जेव्हा त्यांनी मोदी आणि अदानी यांच्यातील संबंध उघड केले, तेव्हा त्यांची संसदेतून अपात्र करण्यात आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.