Sonali Phogat Case : सोनाली फोगट प्रकरणात आता ड्रग्स डिलरचा शोध

तिघांना 5 दिवसांची कोठडी : फोगट खून प्रकरण सीबीआयकडे देणार
Sonali Phogat
Sonali PhogatTwitter
Published on
Updated on

Sonali Phogat Case : अमली पदार्थांचा अड्डा बनलेला कर्लिस बार आता पोलिसांच्या रडारवर असून फोगट यांना ड्रग्स पुरवणाऱ्यांची साखळी उखडण्यासाठी पोलिस सक्रिय झाले आहेत. ड्रग्स पेडलर रामदास मांद्रेकर याला ड्रग्स पुरवणाऱ्या डिलरचा शोध सुरू आहे. याच प्रकरणात अन्य काहीजणांच्या अटकेची शक्यता असून पोलिस या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी गोवा सरकारकडे केली आहे. गोव्याने हा तपास सीबीआयकडे देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. या प्रकरणातील ड्रग्स पेडलर दत्तप्रसाद गावकर याला ड्रग्स पुरवणारा संशयित रामदास ऊर्फ रामा मांद्रेकर याला हणजूण पोलिसांनी काल रात्री उशिरा ताब्यात घेतल्याने या प्रकरणात मुख्य संशयितांसह अटक केलेल्यांची संख्या पाचवर पोहचली आहे. संशयित मांद्रेकर हा पर्यटकांना भाड्याने दुचाकी तसेच कार पुरविण्याचा व्यवसाय करतो. एडविन नुनीस, दत्तप्रसाद गावकर, रामदास मांद्रेकर यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी बजावली.

काही राजकीय नेत्यांवरही संशय

सोनाली भाजपच्या वजनदार नेत्या असल्याने हे प्रकरण ‘हायप्रोफाईल’ बनले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात काही वजनदार राजकीय नेते गुंतल्याचाही आरोप केला आहे. ही घटना जरी गोव्यात घडली असली तरी त्याची पाळेमुळे हरियाणातही पोहचली असल्याने हा तपास सीबीआयकडे देणे योग्य असल्याचे मत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केले.

एडवीनच्या वकिलांचा युक्तिवाद

1. पोलिस कोठडीसाठी हणजूण पोलिसांनी कर्लिसचा चालक संशयित नुनीस याला न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याने जामिनासाठी अर्ज केला होता.

2. कर्लिस बीच शॅकचे मालक नुनीस नाही. त्यामुळे कर्लिस बीच शॅकच्या बाथरूममध्ये सापडलेल्या 2.20 ग्रॅम ‘मेटामेंफाटमाईन’ या ड्रग्सशी किंवा सोनाली यांच्या खून प्रकरणाशी त्यांचा काहीच संबंध नाही.

3. जप्त केलेले ड्रग्स पॉलिथिन पिशवीसह वजन केले आहे. त्यामुळे त्याचे वजन 2 किंवा 2 ग्रॅमपेक्षाही कमी होऊ शकते.

4. 2 ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी ड्रग्ससंदर्भात प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांना सुनावणी घेण्याचा एनडीपीएस कायद्याखाली अधिकार आहे, असा युक्तिवाद नुनीसचे वकील राजू पोवळेकर यांनी केला होता. मात्र, न्यायाधीशांनी तो फेटाळला.

दस्तावेजाची माहिती आवश्‍यक

सरकारी वकील शिवानी बोडके यांनी युक्तिवाद करताना ‘कर्लिस’कडून या बीच शॅकच्या दस्तावेजांची माहिती दिली गेलेली नाही. ती मिळवण्यासाठी केअरटेकर एडवीन नुसीस याची कोठडीत चौकशी करणे गरजेचे आहे. त्यामुळे हा अर्ज फेटाळावा, अशी विनंती न्यायालयाला केली.

आता प्रतीक्षा व्हिसेरा अहवालाची

गोमेकॉत सोनाली यांची शवचिकित्सा केली असली, त्यांना डॉक्टरांच्या पॅनलने मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे पुराव्यासाठी पोलिसांनी अत्यावश्‍यक असलेल्या व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा आहे. हा अहवाल तातडीचा म्हणून मुंबईच्या कलिना लॅबला पाठवण्यात आला आहे. तो मिळाल्यानंतर भरभक्कम पुराव्याच्या दृष्टीने पोलिसांना बळ मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com