मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करणार -दिनेश गुंडू राव

गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी दिली माहिती
Dinesh Gundu Rao
Dinesh Gundu RaoDainik Gomantak

गेले काही दिवस सुरु असलेल्या नाराजी नाट्याने उग्र रुप धारण केले असून गोवा काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना काँग्रेस पक्षातून काढले जाणार आहे. अशी माहिती गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे. त्यामूळे हे दोन्ही नेते पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. (Michael Lobo and Digambar Kamat removed from Congress - Dinesh Gundu Rao )

Dinesh Gundu Rao
मोबोर, केळशी समुद्र किनाऱ्यावर मातीची धूप!

आमच्याच माणसांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला

राव यांनी यावेळी बोलताना गोवा भाजपवर निशाना साधला. तसेच आमच्याच माणसांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असे ते म्हणाले. तसेच काँग्रेस फोडण्यासाठी भाजपने किती पैसा फेकला हे मी सांगू शकत नाही, त्यासाठी मला थोडा वेळ आवश्यक आहे. तेसेच भाजप यासाठी काहीही करु शकते असा ही आरोप दिनेश गुंडू राव यांनी केला.

Dinesh Gundu Rao
अखेर काँग्रेसने मौन सोडले; पक्ष फोडण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो

यावेळी राव म्हणाले की, सध्या राष्ट्रीय काँग्रेस या निर्णयापर्यंत आले आहे की मायकल लोबो यांची विरोधी पक्षनेतेपदावरून उचलबांगडी केली जाणार आहे. तसेच गोवा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामूळे या दोन्ही नेत्यांवर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कारवाई करणार आहे. असे ही ते यावेळी म्हणाले.

या पत्रकार परिषदेत गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी या स्थितीवर भाष्य करताना स्पष्ट केले की, संकल्प आमोणकर, कार्लस फेरेरा, युरी आलेमांव, रूदोल्फ फर्नांडिस, आल्टन डिकॉस्ता काँग्रेस पक्षासोबत कायम आहेत. तसेच अन्य एक आमदार आमच्यासोबत आहे. मात्र उर्वरीतांना अजूनही फेरविचार करण्याचे आवाहन यावेळी केले. तसेच मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांचे भाजपशी संधान असल्याने पक्षाकडून दोघांही विरोधात कारवाई केली जाईल असे ही ते यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com