Goa Congress: ‘वेलनेस फॉरेव्हर’कडून चढ्या दराने औषधांची केली खरेदी; चोडणकरांचा आरोप

महालेखापालांच्या अहवालातून स्पष्ट
goa congress leader girish chodankar Press
goa congress leader girish chodankar PressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress Leader Girish Chodankar: गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) ‘वेलनेस फॉरेव्हर मेडिकल प्रा. लि.’ कंपनीच्या औषधालयामध्ये (फार्मासी) औषधांच्या दराच्याआडून दिवसाढवळ्या दरोडा टाकला जात आहे.

२०१८ ते २०२२ पर्यंत ‘वेलनेस फॉरेव्हर’ला गोमेकॉने १६३ कोटींचा व्यवसाय दिला, त्यात कोणतीही प्रक्रिया नियमानुसार केली गेली नाही.

महालेखापालांच्या अहवालात हे स्पष्ट म्हटले आहे. ‘अत्यावश्‍यक’ औषधे वेलनेस फॉरेव्हरकडून अव्वाच्यासव्वा दराने खरेदी केली जातात.

या फर्मला फायदा करून देण्याच्या उद्देशानेच गोमेकॉतील औषध खरेदी निविदा प्रक्रिया थांबविली गेल्याचा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय समितीचे सदस्य गिरीश चोडणकर यांनी शनिवारी केला.

काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत चोडणकर बोलत होते. याप्रसंगी जॉन नाझारेथ, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष ज्योएल आंद्रादे आदींची उपस्थिती होती.

goa congress leader girish chodankar Press
IRONMAN 70.3: 'आयर्नमॅन'ला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा! स्पर्धेला जल्लोषात सुरुवात

गोमेकॉतील औषध खरेदीतील घोटाळ्यांची मालिका सांगत चोडणकर यांनी ब्रेन स्ट्रोकच्या उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या ‘रिकॉम्बिनंट टिश्यू प्लाझमिनोजेन अ‍ॅक्टिव्हेटर’ इंजेक्शनची किंमत १३ हजार रुपये आहे; पण गोमेकॉत ते इंजेक्शन २९ हजार रुपयांना खरेदी केले गेल्याचे उदाहरण समोर ठेवले.

त्याशिवाय औषधालयामध्ये १३१.५० रुपयांना मिळणाऱ्या ‘मोरपेनेम’ नावाच्या इंजेक्शनसाठी ४ हजार ८०० रुपये मोजण्यात आले आहेत. नव्याने सेवा सुरू झालेले कॅन्सरचे रुग्णही या लुटीतून सुटले नाहीत.

येथे उपचार घेण्यास आलेल्या रुग्णांना वेलनेस फॉरेव्हर औषधालयामधून महागडी औषधे खरेदी करण्यास सांगितले जाते. दीड हजार रुपये किंमत असलेले ‘वेलनेस’मध्ये पाच ते सहा हजार रुपयांना विकले जाते.

सरकारची आर्थिक स्थिती बिकट असतानाही औषध खरेदीतून मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. काँग्रेस पक्षाने हा मुद्दा यापूर्वी उपस्थित केला असल्याचे ते म्हणाले.

तसेच या औषधालयाचे ६२ कोटी रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठीची नोट मंत्रिमंडळाकडे पाठविल्याचेही त्यांनी सांगितले.

सखोल चाैकशी व्हावी

महालेखापालाने या खरेदीतील तफावती समोर आणलेल्या आहेत, तरीही त्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे.

या घोटाळ्याच्या ज्या प्रशासकीय पातळीवर तक्रारी करावयाच्या आहेत, त्यांच्याकडे आम्ही तक्रारी करीत आहोत. या लुटीबाबत आपण कोणत्याही चर्चेस तयार आहोत.

दक्षता आयोगाकडेही आम्ही तक्रार देणार आहोत; परंतु या घोटाळ्याची चौकशी झाली नाहीतर आम्ही न्यायालयात दाद मागू, असे चोडणकर म्हणाले.

goa congress leader girish chodankar Press
Goa MGP: मगोपच्या फुटीला भाजपमधून हवा; नेतृत्वाला संशय

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com