Goa CM Pramod Sawant flags off IRONMAN 70.3
आज सकाळी (8 ऑक्टोबर) गोव्यात मिरामार बीचवरून आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यानंतर स्पर्धेला जल्लोषात सुरुवात झाली आहे.
आयर्नमॅन ट्रायथलॉनच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
आयर्नमॅन ७०.३ इंडिया इव्हेंटवेळी पहाटे ३ ते संपेपर्यंत मिरामार सर्कल येथील समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने असलेला रस्ता मिरामार सर्कल ते हॉटेल विवांता मिरामार वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
डाव्या बाजूला असलेला रस्ता हा येण्याजाण्यासाठी वाहतुकीसाठी उपलब्ध केला जाणार आहे.
नेहमीच्या प्रवासी बसेस इतर मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत. ज्या रस्त्यावर हा इव्हेंट होणार आहे तेथील परिसर नो पार्किंग व नो स्टॉपिंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
डी. बी. मार्गावरील रहिवाशांसाठी मिरामार रेसिडेन्सी ते कांपाल येथील स्टारबक्स कॅफे येथपर्यंत रस्ता खुला असेल व त्यानंतर त्यांना आतील रस्त्याने पुढे जावे लागेल.
अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणून आयर्नमॅन स्पर्धेची ख्याती आहे. या स्पर्धेत शारीरिक क्षमतेचा कस लागतो. जलतरण, सायकलिंग, रनिंग हे प्रकार स्पर्धेत पूर्ण करावे लागतात.
क्रीडा विश्वात आयर्नमॅन स्पर्धेला अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक स्पर्धा मानली जाते. अनेक ट्रायअॅथलीट या स्पर्धेत यश मिळवण्यासाठी अपार मेहनत घेत असतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.