Goa Politics: BJP सोडून काँग्रेसचा हात धरणारे दिगंबर कामत पुन्हा भाजपात

Goa Congress Rebel: एका गटाचा पाठिंबा; तर एकाचा विरोध..
Digambar Kamat
Digambar KamatDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: मडगावातील काँग्रेस सध्या भरकटलेली आहे. मडगावात एका गटाने या घडामोडीचा तीव्र विरोध केला तर दुसऱ्या गटाने कामत यांचे स्वागतही केले. काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष गोपाळ नाईक यांना विचारले असता, काँग्रेस पक्षाने दिगंबर कामत यांना विरोधी पक्षनेता हे पद नाकारून त्यांच्यावर अन्याय केला, अशी आमची सर्वांची धारणा असून त्यामुळे त्यांना हवा, तो निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आम्ही त्यांना पूर्वीच दिले होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

रायतुरकर यांना विचारले असता, त्यांना पक्षात का घेतले गेले? त्यांची खरीच गरज होती का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आम्हांला पक्षाकडून मिळतील, अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही त्याची वाट पहात आहोत, असे सांगितले.

Digambar Kamat
Goa congress news: मायकल लोबो भाजपा प्रवेश नंतर श्री शांतादुर्गा देवीच्या दर्शनाला!

कोण काय म्हणतोय..

1. 17 वर्षांपूर्वी भाजप सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले दिगंबर कामत आज पुन्हा भाजपात गेले. या निर्णयाबद्दल पक्षाने कार्यकर्त्यांना पूर्णपणे अंधारात ठेवले, अशी प्रतिक्रिया भाजप नेते शर्मद रायतुरकर यांनी व्यक्त केली.

2. भाजप मंडळ अध्यक्ष रुपेश महात्मे यांनी पक्षाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

3. मडगावचे माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो म्हणाले, की दिगंबर कामत यांनी भाजपात प्रवेश केल्याने आता मडगाव येथील कित्येक भाजप नेते कायमचे रिटायर्ड हर्ट होतील.

4. विजय सरदेसाई यांनी एकंदर परिस्थितीवर भाष्य करताना आता मूळ भाजप कार्यकर्ता कोण आणि नवीन कोण हे शोधून काढावे लागेल, अशी प्रतिक्रीया व्यक्त केली.

Digambar Kamat
Digambar Kamat : दिगंबर कामत लढवणार लोकसभेची निवडणूक

संघातील कार्यकर्ते नाराज: दिगंबर कामत यांना भाजपात प्रवेश दिल्याबद्दल मडगाव येथील संघ कार्यकर्तेही नाराज आहेत. मात्र त्यापैकी एकानेही सरळ प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. ज्यांनी मागच्या काही वर्षांत सतत विरोध केला, अशा व्यक्तींना भाजपमध्ये घेणे, हे वैचारिक दिवाळखोरीचे द्योतक, अशी प्रतिक्रिया काही संघ कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com