राजकीय नेत्यातील डॉक्टर जागा होतो तेव्हा... डॉ. अंजली निंबाळकर यांची विमानात वैद्यकीय सेवा : वाचविले तरुणीचे प्राण

Dr Anjali Nimbalkar medical service: काँग्रेसच्या गोवा प्रभारी सचिव अंजली निंबाळकर यांनी आपल्या वैद्यकीय सेवेचा उपयोग विमान प्रवासात करून एका विदेशी तरुणीचा जीव वाचवला.
Anjali Nimbalkar
Anjali NimbalkarDainik Gomantak
Published on
Updated on

विलास ओहाळ

पणजी: काँग्रेसच्या गोवा प्रभारी सचिव अंजली निंबाळकर यांनी आपल्या वैद्यकीय सेवेचा उपयोग विमान प्रवासात करून एका विदेशी तरुणीचा जीव वाचवला. गोव्यातून त्या दिल्लीला इंडिगो विमानातून जात असता त्यांच्यासमोर उभे ठाकलेले आव्हान त्यांनी लीलया पेलले.

सविस्तर माहिती अशी, की दाबोळी विमानतळावरून शनिवारी दुपारी १ च्या सुमारास त्या दिल्लीकडे इंडिगोच्या विमानाने निघाल्या. विमान सुमारे तीस फूट उंचीवर पोहोचले असता एका विदेशी तरुणीला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ती बेशुद्ध पडली. या घटनेमुळे विमानात एकच गोंधळ उडाला.

Anjali Nimbalkar
Goa Nightclub Fire:नाईट क्लबचा सहमालक अजय गुप्ताला यापूर्वीच दणका, करचुकवेगिरीमुळे मांद्रे पंचायतीने नोव्हेंबरमध्ये बजावली होती नोटीस

त्याचवेळी या विमानातून प्रवास करणाऱ्या अंजली निंबाळकर यांनी तत्काळ वैद्यकीय सेवेला प्राधान्य देत त्या तरुणीची तपासणी केली. हाताच्या नाड्या तपासून त्यांनी तिला कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर) उपचार करून शुद्धीवर आणले.

या सुमारे दोन अडीच तासांच्या प्रवासात निंबाळकर या तरुणीवर बारीक लक्ष ठेवून होत्या. विमानतळावर पोहोचल्यावरही अंजली यांनी रुग्णवाहिकेपर्यंत त्या तरुणीला साहाय्य केले. त्यांनी दाखवलेल्या समयसूचकतेचे विमानातील अन्य प्रवाशांनी मनापासून कौतुक केले. डॉ. निंबाळकर यांनी उपचारापासून रुग्णवाहिकेत त्या तरुणीला पोहोचवण्यापर्यंतची काही छायाचित्रे समाजमाध्यमावरील अकाऊंटवर अपलोड केली आहेत.

Anjali Nimbalkar
Goa voters missing: गोव्यातील एक लाख 78 हजार मतदार गहाळ; 10 लाख 84 हजार 956 मतदारांची नोंद

दुर्दैव आडवे आले पण...

दुर्दैव असे, की पहिल्या झटक्यानंतर पुन्हा अर्ध्या तासाने त्या तरुणीला झटका येऊन ती बेशुद्ध पडली; परंतु अशा स्थितीतही डॉ. अंजली यांनी पुन्हा ‘सीपीआर’ उपचार करून तिला शुद्धीवर आणले. तसेच त्यांनी एअरहोस्टेसच्या मदतीने अगोदरच रुग्णवाहिका दिल्ली विमानतळावर सज्ज ठेवण्यास सांगितले. त्यामुळे त्या तरुणीला जीवदान मिळाले.

अवकाशात ३० फूट उंचीवर अशा प्रकारे प्राथमिक उपचार केल्याची ही माझ्या वैद्यकीय सेवेतील ही पहिलीच घटना आहे. माझ्या प्रयत्नांना यश आले, हेच मोलाचे आहे.

- डॉ. अंजली निंबाळकर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com