Goa Congress: लोकसभा उमेदवार निवडीबाबत केंद्रीय कार्यकारिणीची महत्वाची माहिती, पक्षात प्रत्येकाचे मत ऐकून..

गिरीश चोडणकर ः केंद्रीय कार्यकारिणी समितीद्वारेच अंतिम निर्णय
Girish Chodankar
Girish ChodankarGomantak Digital Team

Goa Congress: कॉंग्रेस पक्षात प्रत्येकाचे मत ऐकून घेतले जाते. येथे सर्वसंमतीने निर्णय घेतले जातात. लोकसभेच्या अनुषंगाने राज्यात सर्वेक्षण केले जाईल.

या सर्वेक्षणाच्या आधारे लोकसभेचा उमेदवार ठरविण्यात येणार असल्याचे मत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यकारिणी समितीचे नवनिर्वाचित सदस्य गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केले.

‘गोमन्तक टीव्ही’वर संपादक संचालक राजू नायक यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. चोडणकर म्हणाले, विधानसभा निवडणुकीवेळी आमची पारंपरिक मते फोडण्यात आली, परंतु लोकसभेला काँग्रेस अथवा भाजप असेच मतदान मागील काही वर्षांत होत आले आहे.

यावेळी आप आणि टीएमसी देखील इंडिया गठबंधनासोबत आहे. केंद्रीय कार्यकारिणी समितीद्वारे पक्षात अंतिम निर्णय घेतले जातात.

Girish Chodankar
Porvorim Theft Case: पर्वरीमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; 6 लाखांचा ऐवज लंपास

यापूर्वी केवळ ज्येष्ठ सदस्यांची नेमणूक या समितीवर केली जायची, परंतु राहुल गांधींनी या समितीत ज्येष्ठांसह, सर्व स्तरातील नेते असावेत असा विचार मांडला व तसे बदल करण्यात आले. माझ्यासारख्या बूथ स्तरीय कार्यकर्त्याचा पक्षाने या समितीत नेमणूक करून सन्मानच केला असल्याची भावना चोडणकर यांनी व्यक्त केली.

Girish Chodankar
Banastarim Bridge Accident: अखेर मेघनाला अटकपूर्व जामीन

राहुल गांधी जनतेचा आवाज

राहुल गांधी सर्वांची मते ऐकून घेणारे नेते आहेत. त्यांनी देशभर पायी चालून देशवासीयांच्या समस्या जाणल्या आहेत. देशाच्या विचारांवर हल्ला झालेला असताना ते जनतेचा आवाज बनून विरोध करत आहेत. ते लढवय्ये नेते असल्याची भावना चोडणकर यांनी व्यक्त केल्या.

आमोणकरांनी जाणीव ठेवली नाही’

दिगंबर कामतांना ज्या पक्षाने मुख्यमंत्री बनविले, त्या पक्षाला ते सोडून गेले. शपथा घेऊनदेखील विरोधात गेले, परंतु भाजपाने त्यांना साधे मंत्रिपदही दिले नाही. यावरून त्यांची अवस्था कळून येते. सुभाष शिरोडकर, संकल्प आमोणकर यांच्यासारखे नेते सोडून गेले.

संकल्प आमोणकरांना जिंकवण्यासाठी राहुल गांधी घराघरांत फिरले, याची त्यांनी जाण ठेवली नसल्याची खंत चोडणकरांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com