
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या एका टिप्पणीमुळे भाजप आणि काँग्रेस पक्षांमध्ये बराच वाद उफाळून आला आहे. भारतीय संविधानाच्या ७५व्या वर्धापन दिनी संसदेत केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या टिपण्णीला काँग्रेस पक्ष विरोध करतोय. शहांच्या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांनी त्वरित माफी मागावी तसेच बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी काँग्रेसकडून केली जातेय. मात्र काँग्रेस पक्ष माझ्या विधानाचा त्यांच्या सोयीने वापर करतोय असा पलटवार केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलाय. संविधानावरील चर्चेतून विरोधकांची आंबेडकर आणि आरक्षणाविरोधातील नेमकी भूमिका स्पष्ट झाल्याचे त्यांनी प्रतिपादन केले आहे.
देशात आंबेडकरांच्या नावावरून वाद सुरु असतानाच त्यांच्या शैक्षणिक पात्रतेची ओळख करून देणारी एक पत्रिका तुफान व्हायरल होतेय. तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या ध्रुव राठीने हा फोटो X म्हणजेच ट्विटरवर शेअर केला असून त्याने सोबत "पॉवर ऑफ एज्युकेशन" असं लिहिलं आहे. या एका पोस्टमुळे नेटकऱ्यांमध्ये बराच उत्साह संचारला असून अनेकजण यामधून प्रेरणा मिळत असल्याचं वक्तव्य करतायत. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये आंबेडकरांची शैक्षणिक पात्रता दाखवून दिली गेली आहे, या फोटोमध्ये आंबेडकरांनी स्तऱयामधून प्राथमिक तर मुंबईमधल्या एल्फिन्स्टन हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्याची माहिती मिळते .
यानंतर आंबेडकरांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात बीए करून पदवी प्राप्त केली आणि न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळविली, जिथे त्यांनी एमए आणि पीएचडी दोन्ही पूर्ण केले. पुढे आंबेडकर युनायटेड किंगडम येथे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी गेले आणि कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ग्रेज इन येथे प्रवेश घेतला.
मात्र काही आर्थिक अडचणींमुळे त्यांना १९७१ मध्ये भारतात परतावे लागले होते. वर्ष १९५२ मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आंबेडकरांना राज्यसभेचे साड्यास म्हणून नियुक्त करण्यात आले होते आणि याचवर्षी त्यांनी कोलंबिया विद्यापीठाची डॉक्टरेट तसेच हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली होती.
व्हायरल होणाऱ्या ट्विटवरून अनेकजणं सकारात्मक भूमिका मांडत आहेत, आंबेडकरांच्या शैक्षणिक पात्रतेवर अभिमान व्यक्त करत आहेत. सातारा ते कोलंबिया असा त्यांचा शैक्षणिक प्रवास अनेकांना प्रेरणा देतोय. केंद्रीय गृहमंत्री महित शहा यांनी संसदेत आजकाल काहीही झालं तरीही आंबेडकरांचं नाव पुढे केलं जातं. यापेक्षा जर का एका देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्ग प्राप्त झाला असता अशी टिप्पणी केली होती आणि यावर आक्षेप घेताना राहुल गांधींनी आंबेडकरांना भारताच्या संविधानाचा जनक म्हणत त्यांच्यामुळेच आज देशाला एक दिशा प्राप्त झाल्याचं वक्तव्य केलं होतं आणि यानंतर दोन्ही पक्षांमध्ये तसेच त्यांच्या समर्थकांमध्ये वाद उफाळून आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.