Goa Congress Protest: गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांच्यासह कुंक्कळीचे आमदार युरी आलेमाव यांना गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
Goa Congress Protest Dainik Gomantak

Goa Congress Protest: अदानींविरोधात काँग्रेसचा गोव्यात मोर्चा, पोलिसांसोबत धक्काबुक्की, 2 किरकोळ जखमी

Goa Congress Against Adani: गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांच्यासह कुंक्कळीचे आमदार युरी आलेमाव यांना गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
Published on

Goa Congress Protest Police Action

पणजी: गोवा काँग्रेस समितीने देशातील प्रसिद्ध अब्जाधीश गौतम अदानी यांना सौरऊर्जा करारासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या आरोपाखाली अटक करावी अशी मागणी केली होती आणि गोवा काँग्रेस समितीचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी संपूर्ण घटनेची सखोल चौकशी केली जावी अशी देखील मागणी केली होती. बुधवार (दि. १८ डिसेंबर) रोजी याच विरोधाला आणखीन फाटा फोडत गोव्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज भावनापर्यंत मोर्चाचे नेला आणि यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत काँग्रेसचे पदाधीकारी जखमी झाले आहेत.

गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांच्यासह कुंक्कळीचे आमदार युरी आलेमाव यांना गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Goa Congress Protest: गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांच्यासह कुंक्कळीचे आमदार युरी आलेमाव यांना गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
Goa Congress: काँग्रेस स्वबळावर चांगली कामगिरी करू शकते; सचिव निंबाळकरांचा अहवाल काय म्हणतो वाचा

घडलेल्या प्रकारावर बोलताना गोवा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सरकारला खडे बोल सुनावले, पाटकर म्हणाले की जमीन बाळकावणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला तरीही सरकारचे मौन कायम आहे मात्र खरोखर चुकिचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात मात्र सरकार उभं आहे. "

उद्योगपती गौतम अडाणी यांच्या विरोधात बोलताना गोवा काँग्रेसने हा काही छोटेमोठा मुद्द नाही असा दावा केला होता. अदानींवरचे आरोप गंभीर असल्याने मोदी सरकारने त्यांना अटक करावी कारण यामुळे भारताला परदेशी गुंतवणूक मिळवण्यास कठीणाईचा सामना करावा लागेल असे मत काँग्रेस पक्षाकडून व्यक्त करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com