Captain of Ports terminal: बंदर कप्तान टर्मिनल उद्‌घाटनाला विरोध, इमारत गोवा मेरिटाईम बोर्डसाठी राखीव ठेवण्याची काँग्रेसची मागणी

Goa Maritime Board Headquarters: प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक व जलमार्ग मंत्र्यांना निवेदन पाठवून केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे.
Captain of Ports terminal
Goa Maritime Board HeadquartersDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: येथे नव्याने उभारलेल्या अत्याधुनिक टर्मिनल इमारतीचे २६ जून रोजी ‘बंदर कप्तान खाते’ म्हणून होणारे उदघाटन तात्काळ स्थगित करून ती इमारत भविष्यात स्थापन होणाऱ्या गोवा मेरिटाईम बोर्डच्या मुख्यालयासाठी राखीव ठेवावी, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीने केली आहे.

यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक व जलमार्ग मंत्र्यांना निवेदन पाठवून केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. चोडणकर यांनी या निवेदनात, भारतीय बंदरे अधिनियम २०२५ अंतर्गत प्रत्येक किनारी राज्यात आधुनिक सागरी प्रशासनासाठी मेरिटाईम बोर्ड स्थापन करण्याची तरतूद असल्याचे नमूद केले आहे.

Captain of Ports terminal
Goa Congress: काँग्रेसची 22 सप्टेंबरपासून गोवा राखण यात्रा; युरी आलेमाव यांची घोषणा, पेडण्यापासून काणकोणपर्यंत आयोजन

अशा स्थितीत जुन्या प्रशासकीय चौकटीत कार्यरत असलेल्या कॅप्टन ऑफ पोर्टस विभागासाठी नव्या इमारतीचे उदघाटन करणे हे गोव्याच्या सागरी विकासाच्या दृष्टीने मागासलेले पाऊल ठरेल, असा दावा काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसच्या प्रमुख मागण्या

२६ जून रोजी कॅप्टन ऑफ पोर्टस टर्मिनल म्हणून होणारे उदघाटन रद्द किंवा स्थगित करावे.उदघाटनापूर्वी संबंधित इमारत अधिकृतपणे गोवा मेरिटाईम बोर्डच्या मुख्यालयासाठी समर्पित करावी.भारतीय बंदरे अधिनियम २०२५ नुसार गोवा मेरिटाईम बोर्डच्या स्थापनेसाठी केंद्राने राज्याला निर्देश द्यावेत.ब्ल्यू इकॉनॉमीला चालना आणि युवकांना रोजगार देण्यासाठी राज्यातील सागरी प्रशासनाची पुनर्रचना करावी.बंदरे, जलमार्ग, मत्स्यव्यवसाय, क्रूझ पर्यटन आणि किनारी पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन पारदर्शक बनवावे.

Captain of Ports terminal
Goa Congress: काँग्रेसची बैठक झाली; पण मला निमंत्रण नाही! गिरीश यांच्याशी मतभेत नाहीत

मेरिटाईम बोर्ड नसल्याची खंत

गोव्यात मेरिटाईम बोर्ड नसल्याची खंत व्यक्त करताना काँग्रेसने म्हटले आहे की, जहाज वाहतूक, अंतर्गत जलमार्ग, मत्स्यव्यवसाय, क्रूझ पर्यटन, किनारी व्यापार आणि सागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एक सक्षम व स्वायत्त सागरी संस्था आवश्यक आहे. सार्वजनिक निधीतून उभारलेली आधुनिक इमारत भविष्यातील गरजा लक्षात घेऊन वापरली जावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com