Goa Police: पीएसआय पदे तात्काळ भरा, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना न्याय द्या; गिरीश चोडणकरांची मागणी

Goa PSI Recruitment: मुख्य सचिव तसेच पोलिस महासंचालक यांना पाठविलेल्या पत्रात चोडणकर यांनी नमूद केले आहे की, पीएसआय पदांसाठी एकूण १८७ जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती.
Goa Police
Goa PSI RecruitmentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा पोलिस खात्यातील रिक्त असलेली पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदे तातडीने भरावीत. या भरती प्रक्रियेत होत असलेल्या अनावश्यक विलंबाबाबत तीव्र चिंता व्यक्त करत प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना न्याय द्यावा, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

मुख्य सचिव तसेच पोलिस महासंचालक यांना पाठविलेल्या पत्रात चोडणकर यांनी नमूद केले आहे की, पीएसआय पदांसाठी एकूण १८७ जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. मात्र, उपलब्ध माहितीनुसार केवळ १२६ उमेदवार दिल्ली येथे प्रशिक्षणासाठी रुजू झाले असून, ६० हून अधिक पदे अद्याप रिक्त आहेत.

Goa Police
Goa Political Election: गोव्यात भाजप 30 पेक्षा अधिक जागा जिंकेल! केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सामाजिक योजनांचा घेतला आढावा

फेब्रुवारी २०२६ मध्ये पात्र उमेदवारांची प्रतीक्षा यादी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली होती. तथापि, रिक्त पदे उपलब्ध असूनही आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण करूनही गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्या कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रियेबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

या अनाकलनीय विलंबामुळे पात्र आणि मेहनती गोमंतकीय युवकांमध्ये अस्वस्थता व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व पात्रता निकष पूर्ण करूनही त्यांना त्यांच्या हक्काच्या संधीपासून वंचित ठेवले जात आहे. यामुळे सरकारच्या पारदर्शक व गुणवत्ताधारित भरती प्रक्रियेबाबतच्या बांधिलकीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Goa Police
Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

काँग्रेसच्या मागण्या

प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांना तातडीने कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणीसाठी पाचारण करावे.

उर्वरित सर्व पीएसआय पदे प्रवर्गनिहाय आरक्षणाच्या नियमांनुसार भरावीत.

भरती प्रक्रिया पुढील १५ ते २० दिवसांत पूर्ण करण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करावे.

प्रतीक्षा यादीची अंमलबजावणी आणि रिक्त पदांची स्थिती याबाबत संपूर्ण पारदर्शकता राखावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com