Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Operation Tiger Shiv Sena: ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेना (उबाठा)च्या ९ खासदारांपैकी ७ खासदार शिंदे शिवसेनेत आले, ते स्वतःहून आले आहेत.
Operation Tiger Shiv Sena
Operation Tiger Shiv SenaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेना (उबाठा)च्या ९ खासदारांपैकी ७ खासदार शिंदे शिवसेनेत आले, ते स्वतःहून आले आहेत. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती असून आम्ही ‘एनडीए’चे घटक पक्ष असल्याने ‘एनडीए’ला ताकद देण्यासाठी ते आमच्यात सामील झाल्याचे विधान शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांनी केले.

आझाद मैदान येथे गोवा क्रांतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आले असता माध्यमांशी कीर्तीकर बोलत होते. यावेळी शिवसेना राज्य प्रमुख उपेंद्र गावकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. कीर्तीकर म्हणाले की, शिवसेनेच्या विचारांना धरून आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. आमची जी ‘भाजप’सोबत पूर्वी युती होती ती कायम ठेवली आहे.

Operation Tiger Shiv Sena
Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

आमदार फुटले, ही वस्तुस्थिती!

अशाप्रकारे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे चुकीचे आहे; परंतु देशातील इतर राज्यांत मग ते पश्‍चिम बंगालमधील ‘टीएमसी’ असो किंवा इतर पक्षातून अनेक आमदार-खासदार ‘एनडीए’त सामील होत आहेत. गोव्यातदेखील कॉंग्रेसचे ८ आमदार फुटून भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. जनतेने प्रश्‍न मांडण्यासाठी जेवढी भक्कम ताकद विरोधी आमदारांची लागते तेवढी दिली होती; परंतु आमदार फुटले, ही वस्तुस्थिती असल्याचे कीर्तीकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com