Goa Congress : इमारत बांधकामातील दुरुस्ती तातडीने रद्द करा : चोडणकर

भाजप सरकार सुंदर गोवा राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी कटकारस्थान करत असल्याचे स्पष्ट.
Girish Chodankar
Girish ChodankarGomantak Digital Team

पणजी : भू-माफिया आणि डीलर्सना मदत करण्यासाठी गोवा सरकारने ‘द गोवा लँड डेव्हलपमेंट अँड बिल्डिंग कन्स्ट्रक्शन रेग्युलेशन्स 2010’ मध्ये दुरुस्ती केली आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांनी करून ती रद्द करण्याची मागणी केली.

ही दुरुस्ती रद्द केली नाही तर भाजप सरकार हे सुंदर राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी कटकारस्थान करत असल्याचे स्पष्ट होईल, असेही त्‍यांनी प्रसिद्धीस दिलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे. इमारत बांधकामातील या दुरुस्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र विरोध करत आहे. भू-माफियांसाठी हे सरकार काम करत आहे. लोक आणि पर्यावरण हिताविरोधात निर्णय घेतले जात आहेत.

Girish Chodankar
Goa Petrol-Diesel Price: काय आहेत गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव? जाणून घ्या एका क्लिकवर

इतर राज्यांतून येण्याऱ्या अन्न, फळे, भाजीपाल्‍यावर पूर्णपणे अवलंबून असलेले आमचे राज्य आता मोठ्या फार्महाऊसच्या बांधकामांना परवानगी देऊन बाहेरील श्रीमंत लोकांना संतुष्ट करण्यासाठी आमच्या शेतजमिनी आणि वनजमिनी नष्ट करण्यास पुढे सरसावले आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला.

Girish Chodankar
Smart City Panaji : कामे थांबविली तरी पणजी तुंबणे अटळ; पावसाळ्यात भीती

प्रस्तावित दुरुस्ती रद्द करावी अशी आमची मागणी आहे. आम्ही गोव्यातील सर्व लोकांना आणि स्वयंसेवी संस्थांना विनंती करतो की, स्वार्थी आणि भ्रष्ट राजकारण्यांकडून आमचे चिमुकले राज्‍य नष्ट होण्याआधी आमच्या राज्याचे आणि भावी पिढ्यांचे रक्षण करावे. आपल्या जमिनींचे रक्षण करण्यासाठी ‘गोवा बचाव’सारख्या चळवळीची गरज आहे.

गिरीश चोडणकर, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्‍यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com