Smart City Panaji: कामे थांबविली तरी पणजी तुंबणे अटळ; पावसाळ्यात भीती

विकासासाठी नागरिकांनी कळ सोसावी; बांधकाममंत्री काब्राल यांचे मत, चिंताही केली व्यक्त
Panaji
PanajiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Smart City Panaji: राजधानीतील स्मार्ट सिटीची कामे थांबली आहेत, तर मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे कामे पूर्ण करण्यास पंधरा दिवसांचा अवधी आहे. ही कामे 30 मे नंतर पूर्णपणे थांबतील. सध्याची कामे पाहता पणजीतील नागरिकांना पावसाळ्यात पाणी साचण्याची भीती वाटत आहे.

पाणी साचण्याच्या ठिकाणची गटारव्यवस्था ठीक नसेल तर अर्धे शहर पावसाळ्यात पाण्याखाली असणार, हे नक्की. यावर ‘पावसाळ्यात पणजीवासीयांना अडचण जाणवेलच, परंतु विकासासाठी त्रास सहन करावा’, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

मे महिना संपत आला की पावसाळ्याची चाहूल लागते आणि पणजीतील पाणी साचण्याची भीती लोकांना सतावू लागते.

विशेष बाब म्हणजे पणजीतील नागरिक उघडपणे मत मांडण्यासाठी पुढे येत नाहीत, हेही राजधानीचे मोठे दुःख आहे. मलनिस्सारणाची वाहिनी टाकण्याचे काम गोवा राज्य नागरी विकास खाते (जीसुडा) करीत आहे.

Panaji
Vasco News : कारवाई करा, अन्यथा पालिकेसमोर मासळी विक्री करु; नगराध्यक्षांना इशारा

परंतु सध्या सांतिनेजमध्ये ज्या समस्या निर्माण होत आहेत, त्याचे खापर सार्वजनिक बांधकाम खात्यावर फोडले जात आहे. कारण मलनिस्सारण विभाग त्यांच्या अधिपत्याखाली येतो. महत्त्वाची बाब म्हणजे जीसुडाचा कोणताही अधिकारी किंवा अभियंता या कामाच्या ठिकाणी असत नाही.

त्यामुळे जीसुडा हे काम करतेय, असे वाटतच नाही. काम सुरू असलेल्या ठिकाणी जे बॅरिगेट्स लावले आहेत, त्यावर पीडब्ल्यूडी असे लिहिले असल्याने साबांखाच ते काम करतेय, असा समज नागरिकांचा होत आहे.

एकाचवेळी स्मार्ट सिटीची आणि मलनिस्सारणाची वाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले. त्यात ‘जी-20‘च्या बैठका गोव्यात होत असल्याने काही कामे आहे त्याच स्थितीत ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

30 मे पर्यंत होतील तेवढी कामे पूर्ण करण्याचे आदेश यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे सध्या स्मार्ट सिटीची स्मार्ट रस्त्याची कामे बंद आहेत. जीसूडा करीत असलेले मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम यापूर्वीच कंत्राटदाराला दिलेल्या सूचनेप्रणाणे केले जात आहे.

पाणी साचण्याची शक्यता कोठे?

१) सांतिनेज (विवांता चौक). २) जुंता हाऊस समोरील रस्ता. ३) १८ जून मार्गावरील बॉम्बे बाझार परिसर. ४) महानगरपालिका समोरील रस्ता. ५) हिंदू फार्मसीकडे जाणारा मार्ग. ६) आंबेडकर उद्यान. ७) हिरा पेट्रोल पंपासमोर. ८) मळा परिसरात पीपल्स हायस्कूल परिसर. ९) नगर नियोजन विकास प्राधिकरण इमारत परिसर. १०) पणजी कन्व्हेन्शन सेंटर (नेवगीनगर). ११) कामराभाट.

Panaji
Goa Accident News : रायबंदर येथे कार आणि दुचाकीचा अपघात; वाहनचालक जखमी

आमदार, महापौर यांनी केले हात वर!

पणजीतील कामांमुळे लोकांना त्रास सहन करावा लागलेलाच आहे. परंतु स्मार्ट सिटी व मलनिस्सारणाच्या कामांचा आम्हाला आराखडा सादर केला जात नाही, म्हणून महापौर रोहित मोन्सेरात सांगत होते. परंतु मोन्सेरात हे स्मार्ट सिटीच्या समितीवर आहेत, हे विशेष.

कामांमुळे पाणी साचल्यास लोकांना आणखी एका समस्येला तोंड द्यावे लागेल. या कामांपासून आमदार बाबूश मोन्सेरात आणि महापौर यांनी अगोदरच हात वर केले आहेत.

"पावसाळ्यात काही घडू शकते हे सांगता येत नाही. पाणी साचण्याचे प्रकार नाकारता येणार नाही. परंतु महानगरपालिकेने गटारे साफ केली आहेत, असे महापौर सांगत असले तरी त्यातून पाण्याचा प्रवाह विनाअडथळा होईल की नाही हे आताच सांगणे अशक्य आहे. पाऊस पडण्यानंतरच काही ते सांगता येईल."

उदय मडकईकर, नगरसेवक

"पाऊस पडल्यानंतर शहरातील काही भाग बुडणारच, हे स्पष्ट आहे. पाणी साचण्याची समस्या काही सुटेल, असे वाटत नाही. शहरातील अनेक तज्ञांनीही पावसाचे पाणी वाहून जाण्याविषयी प्रश्‍न उपस्थित केले आहेत, ते पाहता पाणी साचण्याची भीती कायम आहे."

सुरेंद्र फुर्तादो, नगरसेवक

"महानगरपालिकेने गटारांची साफसफाई केली असेल तर पाणी साचण्याची शक्यता कमी आहे. मळ्यातील पाणी साचण्याच्या संभाव्य समस्येवर आपण सतत आवाज उठवत आलो आहे. शहरातील १८ जून रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या गटारांची सफाई केल्याचे सांगितले जाते. परंतु पावसाळ्यात या गटारातून पाहणी वाहून जाईल, अशी अपेक्षा करता येईल."

शुभम चोडणकर, नगरसेवक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Santinez Footpath Damage Panaji
Goa Assembly Election 2027
Horoscope Today August 28, 2026
Panaji Smart City Rs 146 crore
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com