Goa Congress: 'सरकार लोकांसाठी नव्हे कॅसिनोंच्या हितासाठी काम करतेय'

काँग्रेसचा आरोप : महसूल बुडण्याची शक्यता; अनेक प्रश्‍न उपस्थित
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress कॅसिनोवर 28 टक्के कर लावण्याच्या जीएसटी मंडळाच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी गोवा सरकार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिणार असल्याचे उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

मंत्र्यांनी व्यक्त केलेल्या मताचा संदर्भ देत भाजप सरकार हे लोकांसाठी नव्हे तर कॅसिनोंच्या हितासाठीच काम करीत आहे. कॅसिनोंमधून मिळणारा महसूल बुडवण्याचा गुदिन्हो यांचा इरादा आहे, असा आरोप काँग्रेसने गुरुवारी (ता.13) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

Goa Congress
Subhash Phaldesai: मंत्री सुभाष फळदेसाई संतापले; स्वतःच्याच खात्याने शेवटच्या मिनिटाला दिले निमंत्रण

काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस विजय भिके बोलत होते. याप्रसंगी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, उत्तर गोवा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रिनाल्डो रुझारियो उपस्थित होते.

कॅसिनोंची कमाई कोट्यवधी रुपये आहे. मग त्यांच्या व्यवसायावर कर कमी करण्याची काय गरज? असा सवाल भिके यांनी केला. भाजप सरकार क्रोनी कॅपिटलिस्टच्या हितासाठी काम करत आहेत, असे आम्ही नेहमीच म्हणत आलो आहोत. गुदिन्हो यांनी ते कृतीतून सिद्ध केले.

Goa Congress
Land Grab case: एसआयटीमार्फत 47 प्रकरणांची नोंद; मुख्य सूत्रधारासह 'एवढ्या' जणांना अटक

गुदिन्हो हे कॅसिनोंच्या प्रेमात पडले आहे आणि त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी काम करत आहेत. कॅसिनोंना मदत करून सरकारी तिजोरीचे नुकसान करण्याचा गुदिन्हो प्रयत्न करीत आहेत काय? त्यांनी कॅसिनो मालकांशी फिक्सिंग केले आहे का? त्यांना कॅसिनोंकडून बॅग्स मिळणार आहेत का? असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. - विजय भिके, प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com