Land Grab case: एसआयटीमार्फत 47 प्रकरणांची नोंद; मुख्य सूत्रधारासह 'एवढ्या' जणांना अटक

सर्व संशयित जामिनावर: एक सदस्यीय आयोगासमोर सुनावणी सुरू
Land Grabbing Case
Land Grabbing CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Land Grab Case जमीन हडप प्रकरणांचा तपास एसआयटीमार्फत सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 47 प्रकरणांची नोंद झाली असून 30 हून अधिक जणांना अटक झाली असून त्यात महम्मद सोहेल हा मुख्य सूत्रधार आहे. या प्रकरणातील सर्व संशयित जामिनावर असून त्यात सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

या प्रकरणांवरील सुनावणीसाठी सरकारने एक सदस्यीय आयोगाची नेमणूक केली आहे. 27 जूनपर्यंत तक्रारदार तसेच संशयितांना त्यांच्या बाजू मांडण्यासाठी मुदत देण्यात आली होती. आता हणजूण येथील प्रकरणावरील सुनावणी सध्या आयोगासमोर सुरू झाली आहे.

Land Grabbing Case
Valpoi News : गोवा मुक्तीनंतरचा 'हा' महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच मार्गी लागणार

प्रासवाडा - हणजूण येथील सर्वे क्रमांक 538/5 व सर्वे क्रमांक 537/12 मधील मूळ जमिनीच्या मालकीण पेट्रिसिया डी डिसोझा यांच्यावतीने ॲटर्नीचा अधिकार असलेल्या प्रदीप सूर्यकांत हरमलकर यांनी एसआयटीकडे तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीमध्ये रोझा मारिया डिसोझा, इस्टेव्हन डिसोझा, अनिल गोयल, महम्मद सोहेल, अमन ची, ओमप्रकाश मदन्ना व इतरांचा समावेश आहे.

एसआयटीने केलेल्या तपासणीत प्रथमदर्शनी बनवाट दस्तावेजाचा वापर करून ही जमीन विक्रेत्याला देण्यात आल्याचे आढळून आले. ही जमीन विक्रीप्रकरणी झालेल्या नोंदीमध्ये वरील संशयितांची नावे आहेत.

Land Grabbing Case
Van Mahotsav : ... तरच वनमहोत्सवाचा हेतू सफल होईल- सुरेश खांडेपारकर

बोगस दस्तावेजाच्या आधारे विक्री-

या संशयितांनी कटकारस्थान रचून पेट्रिसिया डिसोझा यांच्या मालकीच्या जमिनीची बोगस दस्तावेज तयार करून तो मामलेदार कार्यालयात म्युटेशनसाठी सादर केला.

त्यानंतर बनावट दस्तावेजच्या आधारे ही जमीन संशयितांनी आपल्या मालकीची करून घेऊन त्याची विक्री केली. तक्रारदाराने आपल्या जमिनीची चौकशी केली असता ती त्याच्या नावावर नसल्याचे आढळून आले. याप्रकरणी एसआयटीने तक्रार दाखल केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com