Subhash Phaldesai
Subhash Phaldesai Dainik Gomantak

Subhash Phaldesai: मंत्री सुभाष फळदेसाई संतापले; स्वतःच्याच खात्याने शेवटच्या मिनिटाला दिले निमंत्रण

चौकशीचे आदेश
Published on

Subhash Phaldesai: समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाईंनी स्वतःकडेच असलेल्या खात्यातील अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिल्याचे समजते. कुंकळ्ळी येथे झालेल्या स्वातंत्र्यसंग्रामानिमित्त आयोजित हुतात्मा दिन कार्यक्रमाचे निमंत्रण खुद्द मंत्री फळदेसाई यांनाच अखेरच्या मिनिटाला दिले गेले होते. त्यामुळे संतापलेल्या फळदेसाई यांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Subhash Phaldesai
Mumbai-Margao Vande Bharat: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला जोडणार आणखी 8 डबे

कुंकळ्ळीतील संग्रामानिमित्त पुरातत्व विभागाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तथापि, या कार्यक्रमाची माहिती खु्द या विभागाचा कार्यभार असलेल्या मंत्री सुभाष सरदेसाईंनाच नव्हती. अखेरच्या मिनिटाला फळदेसाई यांना निमंत्रण पाठवले गेल्याचे कळते.

हा प्रकार समोर येताच मंत्री सुभाष फळदेसाई यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. एखाद्या मंत्र्यालाच त्याच्या विभागात काय चालले आहे, याची माहिती शेवटच्या क्षणाला होत असेल तर त्यामुळे संताप वाटणे साहजिकच आहे.

त्यातूनच मंत्री फळदेसाई यांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिल्याचे कळते. निमंत्रण द्यायला विलंब का झाला, याची चौकशी केली जाणार आहे, असे कळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com