Goa Congress: इव्हेंट- उत्सवावरील खर्च बंद करा, मुंबईत गोवा भवन होणे काळाची गरज- एल्टन डिकोस्ता

Margao News: अयोध्येतील गोवा भवन प्रत्यक्षात येवो अशी आशा बाळगूया- डिकोस्ता
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Margao News: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची अयोध्येतील गोवा भवन बांधण्याची घोषणा प्रत्यक्षात येवो अशी आशा बाळगूया.

मुंबईत गोवा भवनाची खास करुन गोव्यातील कर्करोग आणि गंभीर रुग्णांच्या कुटुंबियांसाठी नितांत गरज असून नवी दिल्लीतील गोवा सदन आणि गोवा निवास यांची सुधारणा आणि देखभाल प्राधान्यक्रमाने हाती घेणे गरजेचे असल्याचे काँग्रेसचे आमदार एल्टन डिकोस्ता यांनी म्हटले आहे.

अयोध्येत गोवा भवन बांधण्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता म्हणाले यांनी सरकारच्या वेळकाढू धोरणावर टिका केली.

मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी अनेक घोषणा केल्या आहेत ज्या प्रत्यक्षात कधी उतरल्याच नाहीत. गंभीर रुग्णांसह मुंबईत येणाऱ्या गोमंतकीय कुटुंबियांची सोय होण्यासाठी मुंबईत गोवा भवन बांधणे ही काळाची गरज आहे असे त्यांनी सांगितले.

Goa Congress
Panaji News : ‘भोगोसणी’तून गोवा मुक्तीनंतरचे जळजळीत वास्तव: डॉ. सोमनाथ कोमरपंत

गोवा सरकारने 4 कोटींच्या अंदाजे खर्चाच्या नूतनीकरण कामासाठी ऑगस्ट 2015 पासून जुहू येथील गोवा भवन बंद केले आहे. कामाच्या अंतिम पूर्ततेची निर्धारित तारीख जुलै 2022 होती.

भाजप सरकारने जानेवारी 2023 मध्ये सदर काम 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण होईल असे उत्तर विधानसभेत दिले होते.

आम्ही आता फेब्रुवारी 2024 मध्ये आहोत आणि गोवा भवन कधी सुरू होईल याची कोणालाच माहिती नाही, असे एल्टन डिकोस्ता यांनी निदर्शनास आणून दिले.

Goa Congress
Goa Crime News: पिसूर्ले सत्तरीत 22 वर्षीय युवतीने गळफास घेत संपवले जीवन!

यापूर्वीच्या सरकारने गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (जीएसआयडीसी) कडे नवीन मुंबईतील वाशी येथे भूखंड खरेदी करण्यासाठी आणि सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेला मालमत्ता कर आणि इतर शुल्क भरण्यासाठी सुमारे 22 कोटी दिले होते.

दुर्दैवाने, सत्तेत असलेल्या भाजप सरकारकडून प्रकल्पासाठी आवश्यक मंजुरी मिळविणे आणि काम सुरू करणे बाकी आहे, अशी माहिती एल्टन डिकोस्ता यांनी दिली.

मुंबई येथे गोवा भवन बांधण्याची प्रक्रिया 1992 मध्ये काँग्रेस सरकारने सुरू केली होती आणि 1997 मध्ये वाशी येथे 4000 चौरस मीटरच्या दोन भूखंडांसाठी 2.57 कोटींची रक्कम सिडकोला अदा करण्यात आली होती.

त्यानंतर 28.67 कोटींचा अंदाजे खर्च तयार करुन 2011 मध्ये गोवा भवनाचे काम सुरू करण्याची तयारी झाली होती.

मात्र 2012 मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप सरकारचे प्राधान्य इव्हेंट व उत्सव आयोजित करण्याकडे वळल्याने सदर प्रकल्प रखडला असा आरोप एल्टन डिकोस्ता यांनी केला.

चाणक्यपुरी येथील गोवा निवासाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी सरकारने 25.52 कोटींचा अंदाजे खर्च तयार केला आहे आणि नवी दिल्लीतील गोवा सदनच्या नूतनीकरणासाठी 8.45 कोटींचा अंदाजे खर्च तयार केला आहे.

हे दोन्ही खर्चांना गेल्या अनेक महिन्यांपासून शासनाची मंजुरी मिळालेली नाही. गोवा सदनाची अवस्था बिघडत असल्याने लोकांची गैरसोय होत आहे.

गोवा निवास येथील परिस्थितीही बिकट आहे. शासनाने तातडीने नूतनीकरणाचे काम सुरू करावे, अशी मागणी एल्टन डिकोस्ता यांनी केली.

नवी मुंबई आणि नवी दिल्लीला भेट देणाऱ्या गोमंतकीयांबद्दल भाजप सरकारने थोडी संवेदनशीलता दाखवण्याची वेळ आली आहे.

इव्हेंट व उत्सव साजरे करण्यावरील खर्च बंद करुन मुंबई येथील गोवा भवन बांधण्यास प्राधान्य देणे ही भाजप सरकारची जबाबदारी आहे असे एल्टन डिकोस्ता म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com