Goa Congress: ‘भारत जोडो’ यात्रा फलदायी, भाजप फक्त जातीय तणाव निर्मितीत व्यस्त : युरी आलेमाव

काँग्रेसकडून भाजपवर चौफेर टीकास्त्र
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress ‘भारत जोडो’ यात्रेला एक वर्ष पूर्ण होत आहे. यासाठी मडगावच्या लोहिया मैदानावर कॉंग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या जाहीर सभेत केंद्र व राज्य सरकारावर चौफेर टीका केली. दोन्ही सरकारे सर्व क्षेत्रांमध्ये अपयशी ठरलेली आहेत.

नागरिक महागाईने त्रस्त झाले आहेत. युवकांना नोकऱ्या, रोजगार मिळत नाही, गुन्हेगारी, अपघात वाढलेले आहेत, असे कॉंग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले की, देशात मोदी मायाजाल नष्ट होत चालले आहे व याचे उदाहरण म्हणजे कॉंग्रेसचा कर्नाटकमधील विजय.

मोदी सरकार हुकूमशाही पद्धतीने चालू लागले आहे याचा प्रत्यय आता लोकांना येत आहे. त्यामुळे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांवरून राजकारण करू लागले आहेत. भाजपचे सरकार केवळ लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेचे आयोजन करून देशातून द्वेष दूर करण्याचा प्रयत्न केला. या यात्रेद्वारे त्यांनी प्रेम व बंधुत्वाचा संदेश दिला.

मात्र, या यात्रेवरून वैफल्यग्रस्त झालेला भारतीय जनता पक्ष जुने मुद्दे उपस्थित करून जातीय तणाव निर्माण करू पाहत असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

कॉंग्रेसच्या केंद्रीय समितीचे सदस्य गिरीश चोडणकर, कॅप्टन विरियातो फर्नांडिस, आमदार एल्टन डिकॉस्ता, एम.के. शेख यांनीही सरकारवर टीका केली. तत्पूर्वी कॉंग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी दैवज्ञ भवन ते लोहिया मैदानापर्यंत पदयात्रा काढली होती.

Goa Congress
Nilesh Cabral: प्लॅस्टिक बाटलीच्या बदल्यात मिळणार पैसे; प्लॅस्टिक डिपॉझिट रिफंड योजना जानेवारीपासून

श्रीमंतांचे सरकार

ज्या सार्वजनिक बांधकाममंत्र्यांच्या स्वत:च्या मतदारसंघात रस्ते चांगले नाहीत, ते संपूर्ण राज्यातील रस्ते कसे सुधारतील? हे सरकार केवळ श्रीमंतानाच आश्रय देत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे बाणस्तारी येथील अपघात. गोव्यात राज्यभरातील अपघातांमध्ये निधन पावलेल्यांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन पाटकर यांनी मुख्यमंत्र्यांना केले.

Goa Congress
New Education Policy बाबत कामत म्हणतात, 'धोरण टप्‍प्‍याटप्‍प्‍याने लागू करावे', तर 'शैक्षणिक धोरण कागदावरच', व्हिएगसांचे मत

युवक काँग्रेसही आक्रमक

गोव्यातही काँग्रेसतर्फे भारत जोडो यात्रेस सुरवात झाली आहे. गोव्यात सध्या शांतता बिघडविण्याच्या घडलेल्या घटना पाहता काँग्रेस अशा बाबींना कधीही थारा देणार नाही.

याशिवाय राज्यात घडेलेले गुन्हे पाहता कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे दिसून येते, असे प्रदेश युवक काँग्रेसने पत्रकार परिषदेत म्हटले आहे. याप्रसंगी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ज्योएल आंद्रादे आणि माजी अध्यक्ष एहराज मुल्ला यांची उपस्थिती होती.

Goa Congress
सरकारने धरलीय विज्ञान, तंत्रज्ञानाची कास; विविध प्रकल्पांसाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर

या सरकारला लोकांचे प्रश्र्न सोडविण्याची इच्छाच नाही. म्हादई नदी सरकारने कर्नाटकाला केव्हाच विकली. सरकार लोकांना वेगवेगळ्या योजनांतून ३५० कोटी रुपये देणे आहे. राज्य सरकारची आर्थिक स्थिती गंभीर आहे.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

गोव्यात झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याबद्दल हे सरकार कधीच गंभीर नाही. जे काही प्रकल्प गोव्यात राबविले जात आहेत, ते लोकांच्या हिताचे मुळीच नाहीत.

- अमित पाटकर, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष

गणेश चतुर्थीच्या दिवसांत संसदेचे सत्र बोलावणे योग्य नाही. त्याचप्रमाणे जी-२० बैठकीला रशिया व चीनचे राष्ट्राध्यक्ष येत नसल्याने आता जी-२० चे जी-१८ होतील.

- फ्रान्सिस सार्दिन, खासदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com