सरकारने धरलीय विज्ञान, तंत्रज्ञानाची कास; विविध प्रकल्पांसाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर

कोट्यवधींचा निधी मंजूर : विद्यार्थ्यांमध्‍ये वैज्ञानिक दृष्‍टिकोन वाढीस लावणार
Science, Technology
Science, TechnologyDainik Gomantak

The government has sanctioned funds worth lakhs of rupees for various projects to promote scientific outlook among students: समाज आणि विद्यार्थ्यांमध्‍ये वैज्ञानिक दृष्‍टिकोन वाढीस लागावा या घटनात्मक जबाबदारीचे पालन करण्यासाठी राज्य सरकारने विविध प्रकल्पांसाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान खात्याने विविध योजनांतर्गत या निधीला मंजुरी दिली आहे.

वैज्ञानिक जाणीव निर्माण करण्यासाठी विविध संस्था, संघटनांना २३ कोटी ५६ लाख ६९ हजार ११० रुपयांचे अनुदान मंजूर केले असले तरी प्रत्यक्षात संशोधनासाठी ५२ लाख १७ हजार ३६७ रुपयेच मंजूर करण्यात आले आहेत.

या खात्याकडून वैज्ञानिक जाणीव विकसित करण्यासाठी गोवा नावीन्यतम परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. गोवा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्यूएल नोरोन्हा हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत.

शिवाय शाळांतील विविध प्रकल्‍पांसाठी हे खाते निधी पुरवते, संशोधन प्रकल्प पुरस्कृत करते. विज्ञान विषयक व्याखानांचे आयोजन करते.

मनोहर पर्रीकर स्मृती विज्ञान महोत्सवाचे आयोजनही दरवर्षी १३ डिसेंबरला या खात्याकडून केले जाते. विविध संशोधन प्रकल्पांसाठी ५२ लाख १७ हजार ३६७ रुपये तर अनुदानाच्या रुपाने २३ कोटी ५६ लाख ६९ हजार ११० रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

पर्यावरण रक्षणासाठी नॅनो जैववैद्यकीय घटकांचा अभ्यास करण्याकरिता म्हापशाच्या सेंट झेवियर महाविद्यालयाला तीन वर्षीय प्रकल्पाला २ लाख रुपये मंजूर केले आहेत.

Science, Technology
Nilesh Cabral: प्लॅस्टिक बाटलीच्या बदल्यात मिळणार पैसे; प्लॅस्टिक डिपॉझिट रिफंड योजना जानेवारीपासून

साळ नदीतील जैवविविधता अभ्यासासाठी केपे महाविद्यालयाला अडीच लाख, बायोसिरेमिक्सचे हायड्रोथर्मल सिंथेसिस अभ्यासासाठी फर्मागुढीच्या महाविद्यालयाला ३ लाख, गॅस सेन्सिंग वापरासाठी आसगावच्या ज्ञानप्रसारक महाविद्यालयाला अडीच लाख, सौरऊर्जेतील जैवतंत्रज्ञान अभ्यास करण्यासाठी गोवा विद्यापीठाला १ लाख ८६ हजार, जलशुद्धीकरणाची सोपी पद्धत शोधण्यासाठी बिट्‌स पिलानीला २ लाख ६५ हजार, मल्‍टिकोअर प्रोसेसर क्षमतावाढ प्रकल्पासाठी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाला अडीच लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Science, Technology
New Education Policy बाबत कामत म्हणतात, 'धोरण टप्‍प्‍याटप्‍प्‍याने लागू करावे', तर 'शैक्षणिक धोरण कागदावरच', व्हिएगसांचे मत

कचरा व्यवस्थापन महामंडळाला 10 कोटी

राज्यातील मान्सूनची वैविधता (लागवड व वन्य) यांचे दस्तावेजीकरण करण्यासाठी फर्मागुढीच्या वैद्य शिक्षणशास्त्र महाविद्यालयाला अडीच लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच गोवा नावीन्यतम परिषदेला २० लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.

‘टाकाऊतून टिकाऊ’ ही संकल्पना राबविण्यासाठी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाला १० कोटींचा तर मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवासाठी १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com