Goa Job Promise Robbery Case: 24 लाखांच्या दरोड्याचा आरोपी पुन्हा गजाआड! 18 वर्षांच्या तरुणाची फसवणूक; कोलवाळ पोलिसांकडून एकाला अटक

Colvale Police Arrest 29 Year Old: नोकरी लावण्याच्या बहाण्याने दोघांनी अमितला बसने आधी बागा–कळंगुट परिसरात नेले.
Colvale Police Arrest 29 Year Old
Goa Job Promise Robbery CaseDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: नोकरी देण्याचे आमिष दाखवून १८ वर्षीय तरुणाला निर्जन ठिकाणी नेऊन, चाकूचा धाक दाखवत लुटल्याप्रकरणी कोळवाळ पोलिसांनी एका २९ वर्षीय तरुणाला अटक केली.सुभाष कुमार (वय २९, रा. कारासवाडा, मूळचा उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

विशेष म्हणजे, मार्च २०२५ मध्ये पिळर्ण येथे घडलेल्या २४ लाख रुपयांच्या दरोडा प्रकरणातही हा आरोपी सामील होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तो सध्या जामिनावर बाहेर होता. याप्रकरणी अमित कुमार (रा. हणजूण, मूळ रा. सीतामढी, बिहार) या तरुणाने कोळवाळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.२३ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास कोळवाळ येथे ही घटना घडली.

Colvale Police Arrest 29 Year Old
Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

नोकरी लावण्याच्या बहाण्याने दोघांनी अमितला बसने आधी बागा–कळंगुट परिसरात नेले. त्यानंतर त्याला पुन्हा बसने कोळवाळ येथे आणून झाडीतील एका निर्जन ठिकाणी घेऊन गेले. तिथे आरोपींनी त्याला मारहाण केली आणि सुऱ्याचा धाक दाखवून त्याच्याजवळील १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला. एवढेच नाही, तर पीडित तरुणाच्या मोबाईलमधील पेमेंट अॅपचा वापर करून ९,५०० रुपये एका अज्ञात खात्यात ट्रान्सफर करून घेतले.

सहा दिवसांची कोठडी

तक्रार दाखल होताच कोलवाळ पोलिसांनी तत्परतेने तपासचक्र फिरवत आरोपी सुभाष कुमार याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीला गेलेला मोबाईल जप्त केला आहे. आरोपीला म्हापसा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध आणि पुढील तपास कोळवाळ पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com