Goa Beach Shack: खुशखबर! जूनमध्ये वाढले पर्यटक, बीच शॅक्सना मुदतवाढ द्या; व्यावसायिकांकडून होतेय मागणी

Goa Tourism: जूनच्या सुरवातीच्या दिवसांमध्येच देशांतर्गत पर्यटक संख्येत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. पर्यटकांनी गोव्याच्या किनाऱ्यांकडे अधिक मोठ्या प्रमाणावर मोर्चा वळवला आहे.
Goa Beach shack
Goa Beach shack Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा शॅक मालक कल्याण सोसायटीने पर्यटन संचालनालयाकडे सादर केलेल्या निवेदनात, बीच शॅक संचालनासाठी निर्धारित हंगाम ३१ मे ऐवजी ८ जूनपर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे.

हवामानातील अनपेक्षित सकारात्मक बदल व पर्यटकांच्या वाढलेल्या संख्येचा आधार देत ही मागणी करण्यात आली आहे. बुधवारी हा अर्ज सादर करण्यात आला. जूनच्या सुरवातीच्या दिवसांमध्येच देशांतर्गत पर्यटक संख्येत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. पर्यटकांनी गोव्याच्या किनाऱ्यांकडे अधिक मोठ्या प्रमाणावर मोर्चा वळवला आहे.

Goa Beach shack
Goa Beach: मान्सूनच्या आगमनामुळे किनाऱ्यांवर लगबग! शॅक व्यावसायिक, मच्छीमारांची आवराआवर; ट्रॉलरना चक्रिवादळाची धास्ती

पर्यटन संचालक केदार नाईक यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले, शॅक व्यावसायिकांनी सादर केलेली वस्तुस्थिती आम्ही गांभीर्याने घेतली आहे.

Goa Beach shack
Goa Beach Shack: पावसाने पाणी किनाऱ्यांवर चढू लागले, शॅक मालकांकडून मुदतवाढीचा अर्ज मागे; फटका बसल्याचे मान्य

हवामान पोषक आहे, पर्यटक वाढले आहेत आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तरीही कोणताही निर्णय घेताना सुरक्षेचे निकष आणि पर्यावरणीय भान लक्षात घेतले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com