Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

Goa Tourism: गोवा हाऊसफुल! Long Weekend मुळे किनाऱ्यांवर गर्दी; विदेशी पर्यटक मात्र गायब..

Tourists in Goa: प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पेडणे तालुक्यातील मोरजी, आश्‍‍वे, मांद्रे व हरमल या किनारी भागात देशी पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे.
Published on

मोरजी: प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पेडणे तालुक्यातील मोरजी, आश्‍‍वे, मांद्रे व हरमल या किनारी भागात देशी पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. २४, २५ व २६ जानेवारी या सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे पर्यटकांनी आपला मोर्चा किनाऱ्यांकडे वळविला आहे. मात्र, त्‍यात विदेशी पर्यटकांची संख्या खूपच कमी असल्‍याचे दिसून आले.

देश-विदेशातील पर्यटक दरवर्षी या किनाऱ्यांना मोठ्या संख्येने भेट देतात. त्‍यामुळे अनेक ठिकाणी संगीत रजनी व बीच पार्ट्यांचे आयोजन केले जाते. मात्र त्‍यासाठी आवश्यक परवाने किती आयोजकांनी घेतले आहेत, किती जणांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहेत, याबाबत स्पष्टता नसल्याने घोळ कायम आहे.

या तीन दिवसांत किनारी भागातील अनेक हॉटेल्स व गेस्ट हाऊसेस पूर्णतः बुक झालेली आहेत. पंचायत क्षेत्रात होणाऱ्या संगीत रजनींमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना अबकारी खाते व इतर सरकारी खात्यांना प्रत्यक्षात किती महसूल मिळतो, हा प्रश्‍‍नही उपस्थित होत आहे.

Goa Tourism
Tourist In Goa: हडफडेतील आग, इंडिगोमुळे पर्यटक असंतुलित! पर्यटनमंत्री खंवटेंचे स्पष्टीकरण; टॅक्सी, खड्डे, मोकाट गुरे याबाबत घेणार बैठक

अनेक ठिकाणी कोणतेही परवाने न घेता बेकायदा संगीत रजनी आयोजित केल्या जात असून, मोठ्या प्रमाणात एंट्री फी आकारली जात आहे. तसेच जेवण व कॉकटेल्स अव्‍वाच्या सव्वा दराने विकले जात आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी कारवाई होत नसल्याची नागरिकांमध्ये भावना आहे.

Goa Tourism
Konkan Tourism: डोंगर, नद्या अन् निळाशार समुद्र! जिवंतपणी स्वर्ग बघायचाय? कोकणातल्या 'या' 7 ठिकाणांना नक्की भेट द्या

परवाना, महसुलाबाबत प्रश्‍‍नचिन्‍ह

संगीत रजनींसाठी आवश्यक परवाने किती आयोजकांकडे आहेत, याबाबत स्पष्ट माहिती नाही. बेकायदेशीर एंट्री फी व खाद्यपदार्थांची चढ्या दराने विक्री. पंचायत, अबकारी खाते व इतर सरकारी खात्यांना मिळणाऱ्या महसूलाबाबत संभ्रम.

संगीत रजनींमधून ग्रामपंचायतीला कोणताही थेट महसूल मिळत नाही. पंचायतीकडून कोणालाही ‘ना हरकत दाखला’ दिला जात नाही. रात्री दहानंतर होणाऱ्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.

विलास मोरजे ,सरपंच (मोरजी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com