मायकल, रुडॉल्फच्या हाती घुमट, चर्चिलही आले; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांच्या घरी गणेश दर्शनासाठी नेते, नागरिकांची गर्दी Video, Photo

Goa CM Pramod Sawant Ganesh Festival: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कोठंबी येथील निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले आहेत.
Ganesh Festival In Goa
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: राज्यभरात सर्वत्र श्री गणेशाचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे. गोव्यात गणेश चर्तुर्थीचा मोठा उत्साह पाहायला मिळतो, मोठ्या भक्तीभावाने गणेशभक्त श्रीगणेशाची पूजा करतात. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या घरी देखील श्रीगणेश विराजमान झाले आहेत. मुख्यमंत्री यांच्या घरी बाप्पाची विधिवत पूजा झाल्यानंतर राजकीय नेते, मंत्र्यांनी दर्शनासाठी गर्दी केली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कोठंबी येथील निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले आहेत. विधिवत पूजा करुन सावंत यांनी बाप्पाची प्रतिष्ठापना केली. सावंत यांनी सहकुंटुंब घरात गणेशाची स्थापना केली यावेळी त्यांची पत्नी, मुलगी आणि वडील व नातेवाईक उपस्थित होते. घरातील बाप्पाच्या स्थापने फोटो आणि व्हिडिओ मुख्यमंत्री सावंत यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे.

Ganesh Festival In Goa
'गोव्यासाठी पोस्टाचं वेगळं सर्कल करा, गोमंतकीयांनाच पोस्टमन म्हणून संधी द्या'; सरदेसाईंचे ज्योतिरादित्य शिंदेंना पत्र

मुख्यमंत्री दरवर्षी राहत्या घरी श्री गणेशाची स्थापना करुन भक्तीभावे त्याची पूजा करतात. मुख्यमंत्री सावंत यांच्या घरी स्थापन करण्यात आलेल्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील राजकीय नेते, मंत्री यासह समाजातील विविध नागरिकांनी हजेरी लावली.

Ganesh Festival In Goa
गर्दीला करा बाय! मुंबई ते कोकण प्रवास आता फक्त 3 तास, 'या' दिवशीपासून सुरू होणार Ro-Ro Ferry सेवा

मुख्यमंत्री सावंत यांच्या घरी मंत्री माविन गुदिन्हो, आमदार जीत आरोलकर, माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव, केदार नाईक, संकल्प आमोणकर, खासदार सदानंद शेट तानावडे, चंद्रकांत शेट्ये, कृष्णा दाजी साळकर, आमदार मायकल लोबो, रुडॉल्फ फर्नांडिस यांनी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली. यावेळी मायकल लोबो आणि रुडॉल्फ फर्नांडिस यांनी घुमटावर हात आजमावून पाहिला.

Ganesh Festival In Goa
The Castle Auction: कोट्यवधींना होणार सूझांच्या 'द कॅसल' चित्राचा लिलाव, भारतातील या दुर्मिळ कलाकृतीची खासियत काय?

गोव्यात मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत करण्यात आले आहे. गोव्याते सूपूत्र आणि केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी देखील मये येथील घरी गणरायाचे भक्तीभावे स्वागत करत पूजा केली. याशिवाय विजय सरदेसाईंच्या यांच्या सरदेसाई वाड्यात देखील गणपतीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com