Goa Municipal: म्हापशातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा! प्रलंबित प्रश्नांवर 1 जूनपर्यंत तोडगा; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Goa CM Pramod Sawant Traders Meeting: येथील व्यापाऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी १ जून ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.
Goa CM assures solution to Mapusa traders problems
Goa CM assures solution to Mapusa traders problemsDainiak Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: येथील व्यापाऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी १ जून ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. यामुळे व्यापारी समुदायाला मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे असून, प्रलंबित प्रश्न आता खऱ्या अर्थाने मार्गी लागणार आहेत.

मंगळवारी सायंकाळी उशिरा पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी व्यापारी संघटनांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खालील मुद्द्यांवर स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार, जुन्या प्रलंबित भाडेपट्ट्यांचे तातडीने नूतनीकरण करणे; व्यापाऱ्यांची कथित थकबाकी माफ करण्याबाबत सकारात्मक पावले उचलणे; तसेच थकबाकी न स्वीकारण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

Goa CM assures solution to Mapusa traders problems
Mhapsa: रस्‍त्‍यावर बांधकाम कचरा टाकणाऱ्यास 25 हजारांचा दंड

तसेच, रक्ताच्या नात्यातील वारसांकडे दुकानांचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुलभ करणे आणि व्यापारी समुदायाला भेडसावणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी ‘गोवा नगरपालिका कायदा, १९६८’ मध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.होते.

बैठक खेळीमेळीत

मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या प्रश्नांसंबंधी सरकारकडून लवकरच एक अध्यादेश जारी केला जाणार असून, १ जूनपासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. या बैठकीला नगरविकास मंत्री विश्वजित राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, उपसभापती जोशुआ डिसोझा, पालिका प्रशासनाचे संचालक ब्रिजेश मणेरीकर आणि म्हापसा पालिका मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर उपस्थित

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Karnataka Island Dispute
Guirim River Project
cm pramod sawant
Goa Karnataka border island dispute
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com