CM Pramod Sawant: संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन हा अभिमानाचा क्षण; कार्यक्रमात सहभागी व्हा!

मुख्यमंत्र्यांचे विरोधी पक्षांना आवाहन
CM Pramod Sawant on New Parliment
CM Pramod Sawant on New ParlimentDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant on New Parliment: देशाच्या संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याऐवजी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी विरोधी पक्षांना केले.

CM Pramod Sawant on New Parliment
Goa Crime: गोव्यातील व्यापाऱ्याची 5 लाखाची फसवणूक; छत्तीसगडमधून भामट्याला केली अटक, एक फरार

मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे की, हा एक चांगला कार्यक्रम आहे. पण काहीही कारण देऊन या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे काही विरोधी पक्षांनी ठरवले आहे. यापुर्वी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधींनी अशा प्रकारचे उद्घाटन केले आहे.

काँग्रेसला ते चालते मग आता का विरोध करत आहेत. लोकांना विनाकारण भडकावले जात आहे. विरोधाला विरोध म्हणून या ऐतिहासिक सोहळ्याला विरोध केला जात आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे सौभाग्य मला मिळतेय, ही माझ्यासह गोवेकरांसाठी सौभाग्याची बाब आहे.

यापूर्वी पंतप्रधानांना विविध संसदीय इमारतींचे उद्घाटन करताना आपण पाहिले आहे. संसदेत लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांसाठी हा अभिमानाचा क्षण असणार आहे. त्यामुळे काय कार्यक्रमात सहभागी व्हावे.

CM Pramod Sawant on New Parliment
North Goa: उत्तर गोव्यात आता कोणताही रस्ता खोदता येणार नाही; 'या' तारखेपासून अंमलबजावणी

दरम्यान, देशाची राजधानी दिल्ली मध्ये संसदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या इमारतीचे उद्घाटन 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

तथापि, या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्याऐवजी राष्ट्रपतींच्या हस्ते करा, अशी मागणी करत 19 विरोधी पक्षांनी या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com