North Goa: उत्तर गोव्यात आता कोणताही रस्ता खोदता येणार नाही; 'या' तारखेपासून अंमलबजावणी

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, दोन महिन्यांसाठी खोदकाम पुर्णतः बंद
Roads in North Goa
Roads in North Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

No Digging, No Road Cutting on Roads in North Goa: उत्तर गोव्यातील रस्त्यांवर आता अजिबात खोदकाम करता येणार नाही. तसे आदेशच जिल्हाधिकारी मामू हागे यांनी जारी केले आहेत.

यामध्ये उत्तर गोवा जिल्ह्यातील राष्ट्रीय-राज्य महामार्गांसह, जिल्हा मार्ग इत्यादी रस्त्यांचा समावेश आहे.

Roads in North Goa
Shooting At Vasco : अखेर सुगावा लागला; झुआरीनगर दरोड्याचा प्रयत्न, पोलिसांवर गोळीबार प्रकरणी दिल्लीतून एकाला अटक

येत्या 1 जुनपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एकूण 60 दिवस हा आदेश लागू असणार आहे. कोणत्याही प्रकारचे खोदकाम करता येणार नाही, रस्ते कापता येणार नाहीत. त्यामुळे पावसाळ्यातील जून आणि जुलै या दोन महिन्या जिल्ह्यात कोणत्याही रस्त्यावर खोदकाम करता येणार नाही.

अर्थात यातून सरकारी विभागांना वगळले आहे. वीज विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीएसएनएल, तातडीने बदलावयाच्या वीज वाहिन्या, टेलिकम्युनिकेशन्स केबल्स अशा कामांना यातून मुभा असणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांकडून एखादे काम सुरू असेल तर त्यालाही मुभा असणार आहे. दरम्यान, इतरांनी कुणी या आदेशाचा भंग केला तर संबंधिताला कायद्यानुसार शिक्षा करण्याचे अधिकार प्रशासनाला असणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com