Goa Election: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रादेशिक पक्षांचे युतीचे प्रयत्न

राष्ट्रीवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे गोव्यात आले आहेत. त्यांना भेटण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) हे आज दुपारी गेले आहेत.
Goa party
Goa partyDainik Gomanatak
Published on
Updated on

पणजी: राज्यात मोठ्या प्रमाणात प्रादेशिक पक्षांनी युतीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सत्ताधारी भाजपला (BJP) आगामी निवडणुकीत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी या वाटाघाटी सुरु झाल्या आहेत. राष्ट्रीवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे गोव्यात आले आहेत. त्यांना भेटण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) हे आज दुपारी गेले आहेत. त्यामुळे या भेटीत काय निष्पन्न होते याकडे इतर पक्षाचे लक्ष लागले आहे.

Goa party
Goa Assembly Election: आता मतदारही झाला हुषार

यापूर्वी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्याशी युतीसंदर्भात चर्चा झाली होती असे वक्तत्व केले होते मात्र गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) तसेच गोवा प्रभारी राव यांनी त्याला दुजोरा दिला नव्हता. काँग्रेसकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने सरदेसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांना भेटण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसवरही युतीबाबत दबाव आला आहे. प्रादेशिक पक्षांना भाजपवगळता इतर राष्ट्रीय पक्ष जोडीला हवा आहे. त्यामुळेच ही धडपड सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Student Safety In Mapusa
Goa Online Financial Fraud
BNS Chargesheets Filed
42 Percent Cooperative Societies Closed
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com