GST Council Meet 2023: दिव्यांगांना वाहन खरेदीत सवलत द्या; मुख्यमंत्र्यांची मागणी

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीतील निर्णयांचा गोव्याला लाभ
Goa CM Pramod Sawant At GST Council Meet 2023
Goa CM Pramod Sawant At GST Council Meet 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa CM Pramod Sawant At GST Council Meet 2023: वाहन खरेदी करताना दिव्यांगांना ‘जीएसटी’मध्ये सवलत द्या, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीतील जीएसटी परिषदेच्या बैठकीत केली.

तसेच गोव्यातील व्यावसायिकांकडून ३१ जानेवारी २०२४ पर्यंत जीएसटी अपील दाखल करण्यास विलंब झाल्यास त्यात सवलत द्यावी, असा मुद्दा उपस्थित केला आहे.

डॉ. सावंत आणि जीएसटी कौन्सिलचे सदस्य असलेले मंत्री माविन गुदिन्हो यांनी शनिवारी नवी दिल्लीत अर्थ मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ५२ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीला हजेरी लावली.

त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आम्ही जीएसटी कौन्सिलमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा गोव्यातील करदात्यांना फायदा होईल.

Goa CM Pramod Sawant At GST Council Meet 2023
Goa MGP: मगोपच्या फुटीला भाजपमधून हवा; नेतृत्वाला संशय

मद्य उत्पादकांसाठी पूरक निर्णय

मोटार वाहन खरेदीसाठी दिव्यांग व्यक्तींना सवलतीच्या जीएसटी दरांची मागणी केली आणि समर्थनही केले आहे.

याबरोबरच मद्य उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून वापरले जाणारे ‘ईएनए’ (अतिरिक्त न्यूट्रल अल्कोहोल) हे ‘जीएसटी’अंतर्गत आणू नये, या प्रस्तावाचे आणि मोलॅसिसवरील जीएसटी ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. या निर्णयाचा गोव्यातील मद्य उत्पादकांना फायदा होईल, असेही ते म्हणाले.

क्रूझ शीपमुळे पर्यटनाला चालना

डॉ. सावंत म्हणाले की, जीएसटी कौन्सिलने विदेशी जहाजांना ५ टक्के आयजीएसटी भरण्यात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. जर ते जहाज ६ महिने भारतात क्रूझ जहाज म्हणून काम करत असेल, तर या ६ महिन्यांत ते क्रूझ शीप म्हणून प्रवास करून पर्यटनाला चालना देऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com