Thimaaveshi Boat: अत्याधुनिक जहाज ‘थिमावेशी’ गोव्याकडून मालदिवला रवाना

संशोधनाभिमुख उपक्रमांसाठी होणार वापर
Goa CM inaugurates Thimaaveshi Boat
Goa CM inaugurates Thimaaveshi Boat Dainik Gomantak

भारताशेजारील मालदीव प्रजासत्ताकच्या पर्यावरण, हवामान बदल आणि तंत्रज्ञान मंत्रालयासाठी संशोधनाभिमुख उपक्रमांसाठी तयार करण्यात आलेल्या आणि गोव्यातील विजय मरीन शिपयार्डने बांधलेल्या ‘थिमावेशी’ या कॅटामरन जहाजाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

एफआरपी (फायबरग्लास प्रबलित प्लास्टिक) जहाज लोटली स्थित विजय मरीन शिपयार्डने तयार केले आहे. मालदिव सरकार संशोधनाभिमुख उपक्रमांसाठी वापरणार असलेले जहाज आयआयटी खरगपूरच्या तांत्रिक सहकार्याने तयार केले आहे.

Goa CM inaugurates Thimaaveshi Boat
World Turtle Day 2023 : दक्षिण गोव्‍यात कासवांची पैदास झाली दुप्‍पट

१९६१ पासून गोव्याच्या अर्थव्यवस्थेत जहाजबांधणी उद्योगाचे योगदान असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, जहाज बांधणी क्षेत्रासाठी गोव्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. कोकण मेरिटाइम क्लस्टरच्या स्थापनेमुळे उद्योगाला आवश्यक चालना मिळाली आहे, त्यांचे सरकार उद्योगांना आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. यावेळी विजय शिपयार्डचे आणि मालदीव सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’

आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना पुढे नेत विजय मरीन शिपयार्डने भारतातील पहिले ३० मीटर कॅटामरन जहाज ‘थिमावेशी’ हे पर्यावरण मंत्रालयासाठी मालदीव सरकारकडे सुपूर्द केले आहे. मला खात्री आहे की हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी जहाजबांधणी क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन गोवा’ ची दृष्टी आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com