Dr. Pramod Sawant
Dr. Pramod SawantDainik Gomantak

Goa Government : गोमंतकीयांसाठी मुख्यमंत्र्यांच्या 'या' महत्वाच्या 'तीन' घोषणा; जाणून घ्या सविस्तर

शिर्डीला जाणाऱ्या गाडीला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा
Published on

Goa Government : मुख्यमंत्री देवदर्शन योजनेअंतर्गत राज्यातील भाविकांसाठी शिर्डी आणि तिरुपती दर्शन यात्रा सुरू आहेत. आज शिर्डीला जाणाऱ्या गाडीला मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवत या यात्रेला प्रारंभ झाला.

"सध्या शिर्डी आणि तिरुपती या ठिकाणी यात्रा सुरु आहेत. यापुढे वाराणसी, काशी व अयोध्या येथेही देवदर्शन यात्रा सुरू करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Dr. Pramod Sawant
Goa Forward Party : केंद्राकडून स्थानिक इंजिनची फरफट; कोळसा हाताळण्याचे CMचे आश्नासन फसवे

ते पुढे म्हणाले, राज्यात सांस्कृतिक व धार्मिक पर्यटनासाठी राज्यात योजना सुरु करण्यात येणार आहे. कदंब कालापासूनची मंदिरे राज्यात असून सर्व मंदिरांचे दर्शन कमी खर्चात गोमंतकीय तसेच पर्यटकांना उपलब्ध करण्यासाठी योजना करण्यात येणार आहे. याबाबत अर्थसंकल्पात तरतूद करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Dr. Pramod Sawant
Viral Post: पणजीत सरकारी 'भवन'चे झाले 'हवन'! सोशल मिडिया पोस्ट झाली व्हायरल, अन्...

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा

मोपातील ९५ टक्के नोकऱ्या पेडणेवासीयांनाच देण्यात आल्या आहेत. तसेच दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना लवकरच मोफत तीन गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत. मोपावरील प्रवाशांना दक्षिण गोव्यात आणण्यासाठी पेडणे ते काणकोण मार्गावर रेल्वे सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com