Vasco Traffic Police : वास्को वाहतूक पोलिसांची कारवाई; दमदार कामगिरी सहा महिन्यात केलाय... एवढ्या लाखाचा दंड वसूल

सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत किमान 500रुपये ते कमाल 10 हजार रुपयांपर्यंत दंड वसुली
Vasco Traffic Police
Vasco Traffic PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Vasco : वाहतूक नियमांचे उलंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करत वास्को वाहतूक पोलिसांनी १ जानेवारी २०२३ ते आजपर्यंत एकूण १५, ४३७ गुन्हे दाखल करून ९९ लाख ६१ हजार ५०० रुपये दंडापोटी वसूल करून सरकारी तिजोरीत जमा केला. सदर गुन्ह्यांची कारवाई वाहतूक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत किमान ५०० रुपये ते कमाल १० हजार रुपयांपर्यंत दंड वसुली करण्यात आली.

सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत केलेल्या कारवाईत तांबडी बत्ती गुल होणे(७०३ गुन्हे, ३.५६ लाख रु.), माल गाडीतून प्रवासी नेणे (१३५ गुन्हे, ७२,५०० रुपये), बेफीकीरपणे गाडी हाकणे (१४६ गुन्हे, १२५०० रुपये), दुसऱ्या गाडीला मागे टाकण्याचा प्रयत्न करणे (५५ गुन्हे, २७ हजार रु.) लायसन्स शिवाय गाडी चालवणारे (१४९ गुन्हे २.७८ लाख रु.),

रस्ता सोडून गाडी चालवणे (४ गुन्हे, २००० रुपये), जादा प्रवासी बसवून नेणे (१३९ गुन्हे, १.३४ लाख रु.), केबिन मध्ये प्रवासी कोंबणे (२४१ गुन्हे १.३० लाख रु.) याशिवाय पदपथावर पार्किंग (३५३ गुन्हे, १,७६,००० रुपये), इतर गुन्हे (३७९ गुन्हे, १,८६,५०० रुपये) यांचा समावेश आहे.

Vasco Traffic Police
Goa Session Court : तारक आरोलकर यांना गोवा खंडपीठाचा दिलासा ; नगरसेवक अपात्रतेचा..

अशाप्रकारे वास्को वाहतूक पोलिसांनी वाहतूक पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली भरीव कामगिरी करताना गेल्या पाच महिन्यात एकूण १५, ४३७ गुन्हे दाखल करून ९९ लाख ६१ हजार ५०० रुपये दंड वसूल करून सरकारी तिजोरीत जमा केले.

अपघात संख्येत वाढ होत असून देखील जास्त करून युवा वाहन चालकांचे अजून डोळे उघडत नाही. अतिवेगाने वाहन हाकून युवक आपला जीव धोक्यात घालतात व दुसऱ्यांनाही त्रासात टाकतात. प्रत्येकाने वाहन वेगमर्यादेत हाकले तर अपघात आपोआप टळतील.

Vasco Traffic Police
कोकणवासीयांची गणेशोत्सवासाठी वंदे भारतला पसंती, जुलै, ऑगस्ट रिकामा; कसे कराल सेमी हायस्पीड ट्रेनचे बुकिंग?

धोकादायक पार्किंग; १७ लाखांचा दंड

सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत केलेल्या कारवाईत सर्वाधिक गुन्हे धोकादायक पार्किंगचे ३५०९ असून त्याद्वारे १७ लाख ५४ हजार ५०० रुपये एवढी रक्कम दंडापोटी वसूल करण्यात आली. तर विनाहेल्मेट दुचाकीस्वारांकडून २११६ प्रकरणांतून २.५१ लाख रु. वसूल केले. तसेच अतिवेगाने गाडी हाकलणे (६६४ गुन्हे, ६.६२ लाख रु), मद्यपान (११ गुन्हे, ही रक्कम न्यायालयात भरली जाईल), वाहन चालवताना मोबाईलचा वापर (२७९ गुन्हे, २.७० लाख) इतका दंड वसूल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com