CM Pramod Sawant: पुढच्या 25 वर्षांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; तिळारीबाबत गोव्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट
Pramod Sawant and Devendra Fadnavis Dainik Gomantak

Tillari Dam: पुढच्या 25 वर्षांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; तिळारीबाबत गोव्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट

CM Pramod Sawant On Tillari Dam: महाराष्ट्र हद्दीतील तिळारी कालव्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. गोव्याप्रमाणेच महाराष्ट्रातील कालव्यांचे देखील काँक्रिटीकरण करण्यात यावे.
Published on

CM Pramod Sawant On Tillari Dam: तिळारी धरणातून गोव्याला पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान, आज शुक्रवारी (24 जानेवारी) कुडासे भोमवाडातील तिलारी धरणाचा कालवा फुटल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे तिळारी धरणातून गोव्याला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. शुक्रवारी पहाटे ही कालवा फुटल्याची घडल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षीच या ठिकाणी डागडुजी करण्यात आली होती. परंतु आता दुरुस्त केलेल्या कालव्याच्या बाजूला मोठे भगदाड पडल्याने पाणीपुरवठा बंद झाला.

पाण्याची नासाडी

दरम्यान, कालवा फुटल्याने मोठ्याप्रमाणात पाण्याची नासाडी झाली. येथील भागातील रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. तसेच, या भागातील भात आणि बागायती शेतीमध्येही पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. तिळारी धरणाच्या जुनाट कालव्यांमुळे हा पेच निर्माण झाला आहे.

CM Pramod Sawant: पुढच्या 25 वर्षांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; तिळारीबाबत गोव्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट
'CM Pramod Sawant प्रति बांदोडकर, ब्रँड गोव्याचा प्रश्न येतो तेव्हा...'; आमदार व्हिएगस यांच्याकडून स्तुतीसुमनांचा वर्षाव

मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

दुसरीकडे, या कालव्यामार्फत होणारा पाणीपुरवठा तात्काळ थांबवण्यात आला असून राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह सरकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांनी डब्ल्यूआरडी खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर आणि आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये यांच्यासह दोडामार्ग येथील कालवा परिसरात कमांड क्षेत्राची पाहणी केली.

मुख्यमंत्री सावंत फडणवीसांची भेट घेणार

महाराष्ट्र हद्दीतील तिळारी कालव्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. गोव्याप्रमाणेच महाराष्ट्रातील कालव्यांचे देखील काँक्रिटीकरण करण्यात यावे. यासाठी मी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.

CM Pramod Sawant: पुढच्या 25 वर्षांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; तिळारीबाबत गोव्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट
CM Pramod Sawant: गोव्यात लवकरच 'स्वतंत्र' पोस्टल सर्कल! टपाल अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची घोषणा

साळ नदीवरील बॅरेजचे काम पूर्ण होणार

साळ नदीवरील बॅरेजचे काम मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. यासाठी 281 कोटींचा अपेक्षित असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, तिळारीतून सोडलेले अतिरिक्त पाणी या बॅरेजमध्ये साठवले जाईल. याची क्षमता 250 एमएलडी असून सत्तरी, डिचोली आणि पेडणे तालुक्याला याचा फायदा होणार आहे.

CM Pramod Sawant: पुढच्या 25 वर्षांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; तिळारीबाबत गोव्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट
CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर; ठाकरेंवर जोरदार टीका करून महायुतीच्या प्रचाराची सुरवात

तिळारीतून पाणीपुरवठा

तिळारी धरणातून गोव्यातील (Goa) बार्देश, सत्तरी, वाळपई, पेडणे आणि तिसवडी तालुक्यांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र कुडासे भोमवाडातील तिळारी धरणाचा कालवा फुटल्याची घटना समोर आल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com