Goa Politics : आप आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार? मुख्यमंत्र्यांच्या भेटीने चर्चेला उधाण

नाताळानिमित्त आप आमदाराच्या घरी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली भेट
CM With Cruz Silva
CM With Cruz SilvaDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुढील पाच-सहा दिवस म्हणजे नूतन वर्षांपर्यंत हा उत्साह असाच राहणार आहे. नाताळानिमित्त रात्री ख्रिस्ती बांधवांच्या घरी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्यासह हिंदू बांधवांनीही एकमेकांच्या घरी जाऊन नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच दुपारी जेवणाचा आस्वाद घेतला. संध्याकाळच्या सत्रात चर्च परिसरात मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वेळ्ळीचे आम आदमी पक्षाचे आमदार क्रुझ सिल्वा यांच्या घरी भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची पत्नी सुलक्षणा सावंत या उपस्थित होत्या. यावरुन आता राज्यात राजकीय चर्चांना उधाण आली आहे.

CM With Cruz Silva
Goa Youth Congress : गोवा युवक काँग्रेसच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी युवा चेहरे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वेळ्ळीचे आम आदमी पक्षाचे आमदार क्रुझ सिल्वा यांच्या घरी नाताळानिमित्त भेट दिली. यावेळी भाजपचे प्रवक्ते व वेळ्ळीचे स्थानिक सॅवियो रॉड्रिग्स यांनी यावर ट्विट करीत प्रतिक्रिया दिली. "मुख्यमंत्र्यांना आप आमदाराच्या घरी जाण्यासाठी वेळ मिळाला आणि माझ्या घरी जाण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. यावर स्थानिकांनी फोन करुन मला प्रश्न विचारले की आपचे आमदार भाजपमध्ये सामील होणार आहेत का?

CM With Cruz Silva
Goa: ट्रिपल सीट तेही विदाऊट हेल्मेट, बाईक रायडरला थेट पोलिस महासंचालकांनीच पकडले

यावर मी असे म्हणेन की, "भाजप आणि आप मधील गोपनीय चर्चेध्ये माझा सहभाग नसतो. मुख्यमंत्र्यांना आणि भाजपला वेळ्ळीमध्ये काय करायचे आहे हे चांगलेच माहित आहे. 'आप'च्या आमदारांना भाजपमध्ये सामील व्हायचे असेल किंवा भाजपला त्यांना पक्षात आणायचे असेल तर हा त्यांचा निर्णय आहे. माझे लक्ष वेळ्ळी, गोवा आणि भारतावर आहे. मी माझ्या लोकांची सेवा करणार आहे. नरेंद्र मोदींची धोरणे आणखीन मजबूत करेन" असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Olympians Development
Pramod Sawant Cabinet Meeting
Goa CM Pramod Sawant accident help
Goa ST Political Reservation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com