Casino Ship: अद्भुत! मांडवीत होणार देशातील सर्वात मोठे 'कॅसिनो शिप'; ‘डेल्टिन रॉयल’पेक्षा अडीचपट भव्य

Biggest Casino Ship Goa: डेल्टा कॉर्प लिमिटेडने त्यांचा विद्यमान ‘डेल्टिन रॉयल’ऐवजी मोठ्या आणि आधुनिक फ्लोटिंग कॅसिनोची उभारणी करण्याची तयारी चालवल्याची माहिती मिळाली आहे.
floating casino
floating casino GoaX
Published on
Updated on

New floating casino in Panaji Mandovi River

पणजी: मांडवी नदीत सध्या असलेल्या सर्वांत मोठ्या ‘डेल्‍टिन रॉयल’ या कॅसिनो जहाजाची जागा त्यापेक्षा अडीचपट मोठे असलेले जहाज घेणार आहे. डेल्टा कॉर्प लिमिटेडने त्यांचा विद्यमान ‘डेल्टिन रॉयल’ऐवजी मोठ्या आणि आधुनिक फ्लोटिंग कॅसिनोची उभारणी करण्याची तयारी चालवल्याची माहिती मिळाली आहे.

जहाजाच्या आसनक्षमतेत वाढ करण्यासाठी ‘डेल्टा कॉर्प’ला गृहखात्याची परवानगी लागणार आहे. ती मिळवण्यासाठी सध्‍या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नवीन कॅसिनो जहाज ‘डेल्टिन रॉयल’च्या तुलनेत अडीचपट मोठे असेल. त्‍यात जागतिक दर्जाचे गेम्‍स, प्रीमियम लक्झरी सुविधा आणि अधिक क्षमतेची सोय असेल.

‘डेल्टा कॉर्प’कडून सध्या गोव्यात तीन ऑफशोअर कॅसिनो (डेल्टिन रॉयल, डेल्टिन जॅक आणि किंग्ज कॅसिनो) चालविले जातात. तसेच गोवा आणि सिक्कीममध्ये जमिनीवरील तीन कॅसिनोही चालविले जातात.

भारतातील गेमिंग बाजार सध्या प्राथमिक टप्प्यात असला तरी वेगाने वाढत आहे. शहरीकरण, वाढता खर्च करण्यायोग्य उत्पन्न आणि उत्तम वाहतूक सुविधा यामुळे हा विस्तार आणखी वेगवान होण्याची अपेक्षा गृहीत धरून हे नवे जहाज आणले जात असल्याचे सांगण्यात येते.

गोवा हे ‘डेल्टा कॉर्प’साठी महत्त्वाचे केंद्र आहे, जिथे २०२४ मध्ये देशांतर्गत पर्यटकांची संख्या २२ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र विदेशी पर्यटकांची संख्या कोविड महामारीपूर्व स्तरावर अद्याप पोहोचलेली नाही. २०२४च्या पहिल्या सहामाहीत भारतात विदेशी पर्यटकांच्‍या आगमनात ९.१ टक्के वाढ झाली आहे. त्याचाही विचार नवे जहाज आणताना केला गेला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

floating casino
Goa Casino: आता दोन वर्ष No Tension; मांडवीतील कॅसिनोंना 2027 पर्यंत मुदतवाढ

धारगळमध्ये कॅसिनो व्हिलेज?

धारगळ परिसरात १०० एकर क्षेत्रात एकत्रित रिसॉर्ट विकसित केले जाणार आहे. ज्यामध्ये पंचतारांकित हॉटेल, इलेक्ट्रॉनिक्‍स कॅसिनो, थिम पार्क, शॉपिंग मॉल आणि गेमिंग झोन असेल, अशी माहिती मिळाली आहे.

floating casino
Big Daddy Casino 2024-25: 'बिग बॅश'मध्ये रंगणार रॅपर किंगचा शो, मध्यरात्री ५०० ड्रोनचा Display

‘डेल्टिन रॉयल’ देशातील मोठे कॅसिनो जहाज

मांडवी नदीत असलेले ‘डेल्टिन रॉयल’ हे जहाज देशातील सर्वांत मोठे कॅसिनोवाहू जहाज आहे. एकावेळी दोन हजार जणांना सामावून घेण्याची या जहाजाची क्षमता आहे. ४० हजार चौरस फूट क्षेत्रात हे जहाज विस्तारलेले आहे. आता त्याच्या अडीचपट मोठे कॅसिनो जहाज येणार आहे, म्‍हणजे केवळ कल्पनाच केलेली बरी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com