
पणजी: कला अकादमी, कांपाल येथे सुरू असलेल्या गोवा काजू महोत्सव २०२५ ला दुसऱ्या दिवशी सार्वजनिक सुटी असल्याने लोकांची गर्दी उसळली. येथील दालनांतही लोकांची रीघ लागली होती.
शनिवारी रात्री मीत ब्रदर्स यांच्या संगीतावर प्रेक्षकांना फेर धरण्यास भाग पाडले तर रविवारी समारोप कार्यक्रमात बॉलिवूड गायिका नीती मोहन यांनी आपल्या संगीताने प्रेक्षकांना भुरळ पडली. दुसऱ्या दिवशी देखील तांत्रिक चर्चासत्रे झाली. काजू प्रक्रिया उद्योग, शेतीतील नवकल्पना आणि फेणी या पारंपरिक गोमंतकीय पेयावर आधारित चर्चासत्रांना मोठा प्रतिसाद मिळाला. या तांत्रिक सत्रांमध्ये शेतकरी, उद्योगतज्ज्ञ आणि काजूप्रेमींचा सक्रिय सहभाग होता.
''काजू शेतीतील नवकल्पना : स्मार्ट शेतीचे भवितव्य'' या सत्रात पारंपरिक काजू शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत चर्चा झाली. अटल इनक्युबेशन सेंटरचे अभिषेक सिंग, कामिरेड्डी अॅग्रो फूड्सचे संस्थापक डॉ. किरण कामिरेड्डी, क्रॉप डोमेनचे डॉ. महादेवा स्वामी, गोवा वनविकास महामंडळाचे प्रतिनिधी आणि ''गोवन''चे डॉ. प्रदीप सरमोकादम यांनी आपले विचार मांडले. स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनवाढ आणि शेतीतील शाश्वतता कशी साधता येईल, यावर भर दिला गेला. उपस्थितांनीही विचारपूस करून नवकल्पनांबाबत उत्सुकता व्यक्त केली.
'फेणी : परंपरेपासून जागतिक ब्रँडिंगपर्यंतचा प्रवास' या विषावर झालेल्या चर्चासत्रात फेणीला नवे वळण देण्यासाठी चर्चा झाली. ‘आणि एक फेणी’चे क्लेमेंट डिसिल्वा यांनी सत्राचे संचालन केले. पॅनेलमध्ये बार कोल्ड ड्रिंक्सचे अनंत शिरोडकर, अबकारी विभागाचे अधीक्षक महेश कोरगावकर, ‘स्टिलडिस्टिलिंग स्पिरिट्स’च्या कस्तुरी बॅनर्जी आणि काझुलो प्रीमियम फेणीचे हॅन्सेल वाझ यांचा समावेश होता.
''काजू प्रक्रिया उद्योग : नवसंशोधन व नावीन्यपूर्ण उत्पादने'' यात गोवा आयुर्वेद व पारंपरिक औषध प्रणाली परिषदेच्या अध्यक्ष डॉ. स्नेहा भागवत यांनी संचालन केले. पॅनेलमध्ये ‘काझ्यू ट्री’चे विंदेश शिरोडकर, ‘गोअन फेस्ट’चे राजेंद्र जाधव आणि ‘गोयंची फेणी’चे यश सावर्डेकर सहभागी झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.