Cash For Job Scam मध्ये राजकारण्याचे नाव नाही! मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा; ‘फातोर्डा ते लंडन’ प्रकरणाबाबत दिला इशारा

CM Pramod Sawant: राज्यात गाजणाऱ्या नोकऱ्यांच्या घोटाळा प्रकरणांमध्‍ये पोलिस तपासात अद्याप कोणत्याही राजकारण्याचे नाव पुढे आलेले नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथे सांगितले.
Cash For Job, goa government job scam, goa job fraud
Cash For Job ScamCanva
Published on
Updated on

No Poltical Connection In Cash For Job Says CM Pramod Sawant

पणजी: राज्यात गाजणाऱ्या नोकऱ्यांच्या घोटाळा प्रकरणांमध्‍ये पोलिस तपासात अद्याप कोणत्याही राजकारण्याचे नाव पुढे आलेले नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पर्वरी येथे सांगितले. पोलिस तपास योग्य दिशेने सुरू आहे. त्यामुळे जनतेत विश्‍‍वास निर्माण झाला असून अनेक तक्रारदार पुढे येत आहेत, असा दावाही त्‍यांनी केला.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकरणाची उकल मीच करून दिली होती. त्यानंतर तपासकामात कुठेही हस्तक्षेप केलेला नाही. पोलिस कारवाई करतात याविषयी विश्वास वाढल्याने लोक तक्रार देण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत.

या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. सुरवातीला केवळ नोकरी देतो म्हणून पैसे घेऊन फसवणूक होण्‍यापुरता हा घोटाळा मर्यादित होता. त्यानंतर बँकेतील कागदपत्रांत फेरफार, सदनिका देतो म्हणून पैसे घेऊन केलेली फसवणूक, बनावट प्रमाणपत्रांच्या बदल्यात घेतलेले पैसे असे अनेक घोटाळे समोर आले आहेत, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

‘फातोर्डा ते लंडन’ प्रकरणाचा तपासही युद्धपातळीवर

फसवणुकीच्‍या प्रकरणांत गुंतलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही. ‘फातोर्डा ते लंडन’ प्रकरणाचा तपासही शेवटची संबंधित व्यक्ती पकडली जाईपर्यंत बंद केला जाणार नाही. कुडचडे येथे एका महिलेने बॅंकेतील पैसे हडप केल्याप्रकरणी माहिती मिळाल्यावरून पोलिस तपास करण्यास तक्रारदारास पाठिंबा दिला. संशयित गजाआड झाल्यानंतर आता अनेक तक्रारदार पुढे आले आहेत. असे घोटाळे आणि फसवणुकीचे प्रकार आणखी झालेले असतील आणि अद्याप तक्रार केली नसेल तर तक्रारदारांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्‍यमंत्री सावंत यांनी केले.

Cash For Job, goa government job scam, goa job fraud
Tanvi Vasta Case: 'तन्‍वी' प्रकरणात 'काही' बिल्‍डरही गाेत्‍यात येण्‍याची शक्‍यता! 'नेट बँकिंग'ची माहिती नसलेले अनेकजण झाले शिकार

परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्‍यावर भर

एकंदरीत हे सारे सरकारी नोकरी देतो असे सांगून परस्पर पैसे हडप करणारे लोक आहेत असे दिसून येते. त्यांच्यावर न्यायालयीन माध्यमातून कारवाई व्हावी यासाठी परिस्थितीजन्य पुरावे पोलिस गोळा करत आहेत. बहुतांश व्यवहार रोखीने झाले असले तरी त्यासंदर्भातील पुरावे कसे गोळा करावेत हे पोलिसांना माहीत आहे. ते योग्य कारवाई करतील. मुळात कारवाई केली जाते याविषयी जनतेत विश्‍‍वास निर्माण झाला आहे. भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी अशा प्रकरणांच्‍या मुळाशी जाऊन ही कीड कायमची ठेवण्‍याचे ठरविले आहे, असे मुख्‍यमंत्री सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com