Jaminivele Khel: 'खेंव चोयलो रे'! रंगमंचावर नाही, जमिनीवर सादर होणारे लोकनाट्य "जमिनीवेले खेळ"; सासष्टी कार्निवल विशेष

Jaminivele Khel Games Goa: 'अमको अमको खेंव चोयलो रे' (अमुक अमुक खेळ पाहिला का?) असा प्रश्न अनेक जण त्या दिवसात एकमेकांना विचारत असतात.
Jaminivele Khela Games Goa
Jaminivele Khela Games GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मारियो पिरीस

चार दिवसांच्या कार्निव्हल महोत्सवाची सुरुवात प्रमुख शहरांमध्ये झाली आहे.‌ चित्ररथांची (फ्लोट्स) परेड हे कार्निव्हलचे सर्व शहरांमध्ये मुख्य आकर्षण असते.‌ स्थानिक आणि पर्यटक दोघेही चित्ररथांची आणि चित्ररथांचीची मजा उत्साहाने घेतात. सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या काही गोमंतकीय परंपरा या चित्ररथांमध्ये दिसतात तेव्हा अनेकांचा ऊरही (नोस्ताल्जियाने) भरून येतो. 

शहरांमध्ये चित्ररथांच्या माध्यमातून कार्निव्हल जल्लोषात साजरा होतो तर गावामध्ये, विशेषतः सासष्टी तालुक्यात, प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या एका वेगळ्या मजेदार माध्यमातून तो साजरा केला जातो- ज्याचे नाव आहे 'जमिनीवेले खेळ'!

हे  'जमिनीवेले खेळ' एक प्रकारे कार्निव्हल उत्सवाचा समानार्थी शब्द आहे म्हणण्यास हरकत नसावी. एकप्रकारे लोकनाट्य असे बिरूद लाभलेल्या या 'जमिनीवेले खेळा'चा आस्वाद अबालवृद्ध घेतात.  'अमको अमको खेंव चोयलो रे' (अमुक अमुक खेळ पाहिला का?) असा प्रश्न अनेक जण त्या दिवसात एकमेकांना विचारत असतात.

 'जमिनीवेले खेळ' रंगमंचावर नव्हे तर त्यांच्या नावाप्रमाणेच जमिनीवर सादर होतात. प्रत्येकी 30 ते 40 मिनिटांच्या तीन लोकनाट्याचे होणारे सादरीकरण हे या जुन्या पारंपारिक कलेचे वेगळेपण आहे.‌ वर्तमान समाजाशी संबंधीत असलेल्या कौटुंबिक, सामाजिक आणि धार्मिक विषयांचा समावेश 'जमिनीवेल्या खेळा'त असतो.

गाणी (कात), संगीत, अभिनय यातून जोशपूर्ण रीतीने प्रेक्षकांना संदेश दिला जातो. कोकणी रंगमंचावरील 'तियात्र' या माध्यमाच्या सादरीकरणात तीन किंवा चार  कांतो (गाणी) असतात मात्र  'जमिनीवेल्या खेळा'त प्रारंभी फक्त एक गाणे (ओपनिंग सॉंग) असते आणि नंतर त्यात अनेक कांतो सादर केली जातात. 

Jaminivele Khela Games Goa
Carnival 2025: राजधानीत कार्निव्हलचा जल्लोष! अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची विशेष उपस्थिती

बहुतेक 'जमिनीवेले खेळ' सासष्टी तालुक्यात निर्माण होत असल्यामुळे या प्रकारात साष्टी बोलीचा वापर अधिक केला जातो. ही बोली लोकांना अधिक आवडते व त्यांचे अधिक मनोरंजनही करते.  'जमिनीवेले खेळ' सादर होण्यापूर्वी एखाद्या वाहनाद्वारे त्याची जाहिरात आसपासच्या परिसरात केली जाते आणि त्यामुळे आपोआपच उत्साही जनसमुदाय प्रयोग पाहण्यासाठी जमा होतो. एकेकाळी या प्रकारात फक्त फुंकवाद्ये (क्लॅरिनेट, सेक्सॉफोन इत्यादी) आणि ड्रम्सचा वापर संगीतासाठी व्हायचा परंतु अलीकडच्या काळात की-बोर्ड आणि बास गिटार ही वाद्येही वापरली जातात.‌ 

Jaminivele Khela Games Goa
Goa Carnival: मांद्रे कार्निव्हलसाठी आमदार आरोलकरांचे खास निमंत्रण; डीजे मस्ती ते सुखबीर लाईव्ह, मनोरंजनाची पर्वणी!

गेली तब्बल तेरा वर्षे 'जमिनीवेले खेळां'ची वार्षिक स्पर्धा आयोजित होत होती परंतु यावर्षी ‘तियात्र अकादमी ऑफ गोवा’ने स्पर्धा रद्द करून सर्व सहभागी संस्थाना विशिष्ट रक्कम अदा करण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. पारितोषिकांसंबंधी होणारे वादविवाद टाळावे हा देखील त्यामागचा हेतू आहे. 

1985 पासून 'जमिनीवेले खेळ' सादर करणारा आघाडीचा दिग्दर्शक जेवियर द मायणा यावर्षी तीन खेळांसह सज्ज झाला आहे. त्याची पत्नी आणि तीन मुले असे त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्या 'जमिनीवेल्या  खेळा'चा भाग आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com