Goa Carnival 2023: कार्निव्हलच्या नावाखाली मोठी लूट

कार्निव्हलनिमित्त चर्चस्क्वेअर येथील सांबा चौकात कार्निव्हल महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
Goa Carnival 2023
Goa Carnival 2023Dainik Gomantak

Goa Carnival 2023: कार्निव्हलनिमित्त चर्चस्क्वेअर येथील सांबा चौकात कार्निव्हल महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या चौकाच्या एकाबाजूचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

या महोत्सवाचे कर्ते-करविता पणजीचे आमदारांचे जवळचे एक नगरसेवक होते. कार्निव्हलच्या शामियानाचे कंत्राटही एका नगरसेविकेच्या पतीला देण्यात आले होते.

त्यामुळे आमदारांनी या महोत्सवासाठी पणजी महापालिकेतील काही नगरसेवकांना भरमसाट उत्पन्न करण्यास संधी दिली. त्यामध्ये पणजी कार्निव्हल समितीही जबाबदार आहे. कोणीही त्याला विरोध केला नाही व कोणाही सदस्यामध्ये त्याला हरकत घेण्याचे धाडस नव्हते.

सर्व काही चिडीचूपपणे या महोत्सवाच्या नावाखाली पुरस्कृतकर्त्यांकडून अनेक मोफत सुविधा घेण्यात आल्या. एरव्ही सांबा चौकात आयोजन केलेल्या कार्निव्हल पार्टीचे आयोजन भव्यदिव्य होते, तसेच प्रवेशासाठी तिकीट शुल्क होते.

कॅसिनोच्या शुल्कावर कर आकारला जातो, तर या शुल्कावर कर आकारला होता का हे व्यावसायिक खातेच जाणे. हा कार्यक्रम महापालिकेचाच असल्याने त्यांना विचारणारे कोणी नव्हते.

Goa Carnival 2023
Goa Crime: विद्यार्थी अपहरण प्रकरणी जन्मठेप; फिल्मी स्टाईलने पकडले होते आरोपींना

चर्चिल दिगंबरांच्या मोगात

रविवारी मडगाव येथे कार्निव्हल मिरवणूक झाली, त्याला नुवेचे आमदार आलेक्स सिकेरा आणि बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव हे उपस्थीत होते.

मडगाव कार्निव्हलसाठी यावेळी जो मार्गात बदल केला त्याची या दोघांनी एव्हढी स्तुती केली, ते पाहता ही स्तुती करण्यासाठीच तर त्यांना बोलावले नाही ना? असे कित्येकांना वाटले. त्यातल्या त्यात चर्चिल यांनी केलेली स्तुती.

काही वर्षापूर्वी हेच चर्चिल संपूर्ण आलेमाव कुटुंबीयांना घरी पाठविण्याचे कारस्थान दिगंबर कामत यांनीच रचले, असे म्हणून त्यांना शिव्याशाप देत होते. आता तेच चर्चील त्यांच्या मोगात कसे काय हो पडले?

एल्विसला चिंता पणजीची!

काँग्रेस पक्ष सध्या कॅप्टन नसलेल्या जहाजासारखी बनली आहे. कधी पाटकर तर कधी पणजीकर तर कधी जना आणि कधी कधी एल्विस गोम्स आपल्या परीने आपल्या समर्थकांना घेऊन झेंडे फडकावतात. त्यामुळे पक्षात एकी नसल्याचे चित्र स्पष्ट दिसते.

पक्षाचे एक विद्वान नेते एल्विस गोम्स जरी पणजी मतदारसघातून पराभूत झाले असले, तरी त्यांनी पणजीला सोडलेले नाही. स्मार्ट सिटी योजनेचे पूर्ण ऑडिट करण्याची मागणी एल्विस गोम्सने केली आहे

. एल्विस बाब पणजी अजून लांब आहे, कुंकळ्ळीकर प्रदूषणाच्या विळख्यात तडफडत त्यावर ऑडिट मागा ना. सध्या कुंकळ्ळीकर नेत्याविन अनाथ झालेले आहे.

Goa Carnival 2023
Goa Politics: भाजप सरकारमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर गोव्याची बदनामी; तृणमूल काँग्रेसचा घणाघाती आरोप

एल्विसला चिंता पणजीची!

काँग्रेस पक्ष सध्या कॅप्टन नसलेल्या जहाजासारखी बनली आहे. कधी पाटकर तर कधी पणजीकर तर कधी जना आणि कधी कधी एल्विस गोम्स आपल्या परीने आपल्या समर्थकांना घेऊन झेंडे फडकावतात. त्यामुळे पक्षात एकी नसल्याचे चित्र स्पष्ट दिसते.

पक्षाचे एक विद्वान नेते एल्विस गोम्स जरी पणजी मतदारसघातून पराभूत झाले असले, तरी त्यांनी पणजीला सोडलेले नाही. स्मार्ट सिटी योजनेचे पूर्ण ऑडिट करण्याची मागणी एल्विस गोम्सने केली आहे.

एल्विस बाब पणजी अजून लांब आहे, कुंकळ्ळीकर प्रदूषणाच्या विळख्यात तडफडत त्यावर ऑडिट मागा ना. सध्या कुंकळ्ळीकर नेत्याविन अनाथ झालेले आहे.

Goa Carnival 2023
Panjim Smart City: ‘स्मार्ट सिटी’च्या प्रकल्पांची कामे दुय्यम दर्जाची, त्यामुळे...

आणखी मंदिरांची खरीच गरज आहे

सप्तकोटीश्वर मंदिराच्या उद्‍घाटनप्रसंगी दोतोर मुख्यमंत्र्यांनी दिवाडी बेटावर उद्‌ध्वस्त मंदिराच्या जागी नवे मंदिर उभारण्याबाबत केलेली घोषणा या दिवसात बरीच चर्चिली जात आहे.

गेल्या काही वर्षांत गोव्यात धार्मिक स्थळांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, म्हणून सरकारी खर्चाने वेगळे मंदिर खरेच आवश्यक आहे का? असा प्रश्र्न केला जातो.

अनेकांचा असा दावा आहे, की अशी बांधकामे रातोरात होतात व आश्र्चर्य याची बाब म्हणजे ती जागा सार्वजनिक व सरकारी असते. धार्मिक म्हटल्यावर सरकारी यंत्रणा त्यांच्या वाटेला जाण्याची टाळते. खरे तर या सर्व बाबी घोषणा करण्यापूर्वी लक्षात घेण्याची गरज होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com