Goa Tour Package: गोवा वाले बीच पे...! 'IRCTC' घेऊन आलीय स्वस्त आणि मस्त टूर पॅकेज, कसं करायचं बुकिंग? जाणून घ्या सर्व माहिती

IRCTC Goa Tour Package: निसर्गरम्य समुद्रकिनारे, नाईटलाईफ आणि भारतीय-पोर्तुगीज संस्कृतीचा अनोखा संगम असलेले 'गोवा' हे प्रत्येक पर्यटकाचे आवडते ठिकाण आहे.
Goa Tour Package
Goa Tour PackageDainik Gomantak
Published on
Updated on

निसर्गरम्य समुद्रकिनारे, नाईटलाईफ आणि भारतीय-पोर्तुगीज संस्कृतीचा अनोखा संगम असलेले 'गोवा' हे प्रत्येक पर्यटकाचे आवडते ठिकाण आहे. ऐतिहासिक चर्च, प्राचीन मंदिरे, दुधसागरसारखे धबधबे आणि चविष्ट सी-फूडसाठी प्रसिद्ध असलेल्या या राज्याला 'भारताची समुद्रकिनारी राजधानी' मानले जाते. जर तुम्हीही गोव्याच्या सहलीचे नियोजन करत असाल, तर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे.

काय आहे या पॅकेजमध्ये?

IRCTC ने खास पर्यटकांच्या सोयीसाठी 'गोवा डिलाईट' नावाचे टूर पॅकेज लाँच केले आहे. या पॅकेजचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पर्यटकांना विमानाचे तिकीट (Flight Ticket), आलिशान हॉटेलमध्ये राहण्याची सोय, स्वादिष्ट भोजन आणि स्थानिक फिरण्यासाठी बसची सुविधा दिली जाणार आहे.

इतकेच नाही तर, सोबत एक अनुभवी गाईड देखील असेल जो तुम्हाला गोव्याच्या इतिहासाची आणि प्रेक्षणीय स्थळांची माहिती देईल. या संपूर्ण ४ दिवस आणि ३ रात्रींच्या सहलीसाठी प्रति व्यक्ती २९,६२० रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे.

Goa Tour Package
Baba Ramdev In Goa: गोव्यात उभारणार पतंजली 'वेलनेस केंद्र'! योगगुरु रामदेव बाबांची घोषणा; मोठ्या प्रमाणावर होणार रोजगारनिर्मिती

उत्तर आणि दक्षिण गोव्यातील 'या' ठिकाणांना देता येणार भेट

या टूर पॅकेजमध्ये गोव्यातील प्रमुख आकर्षणांचा समावेश करण्यात आला आहे. पर्यटकांना उत्तर गोव्यातील ऐतिहासिक आग्वाद किल्ला, सिकेरी बीच, कांदोळी आणि बागा बीचचा आनंद घेता येईल.

तसेच, जुन्या गोव्यातील (Old Goa) जगप्रसिद्ध 'बेसिलिका ऑफ बॉन जीसस' आणि 'सेंट फ्रान्सिस कॅथोलिक चर्च'ला भेट देण्याची संधी मिळेल. दक्षिण गोव्यातील मिरामार बीच आणि संध्याकाळी मांडवी नदीमधील क्रूझ सफारी या सहलीची शोभा वाढवणार आहे.

Goa Tour Package
Goa Police: पोलिसांत अधीक्षकांची ‘भाऊगर्दी’! मंजूर पदांपेक्षा वाढल्या बढत्या; अतिरिक्त कार्यभार कमी करण्याचे कारण पुढे

बुकिंग कशी करावी?

तुम्हालाही या पॅकेजचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमचे तिकीट बुक करू शकता. सहलीच्या तारखा, उपलब्ध जागा आणि इतर अटी व शर्तींसाठी पर्यटकांनी https://www.irctctourism.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. खिशाला परवडणाऱ्या दरात गोव्याची सफर करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com