Goa Cancer Cases: कॅन्‍सरमुळे राज्‍यात दिवसा सरासरी तिघांचा मृत्‍यू! 5 रुग्‍णांची होते नोंद; आतड्याच्या कॅन्‍सरचे प्रमाण वाढल्‍याचा आरोग्‍य खात्‍याचा दावा

Goa Cancer Deaths: राज्‍यात दरवर्षी कॅन्‍सरचे रुग्‍ण आणि त्‍यामुळे होणाऱ्या मृतांच्‍या संख्‍येत वाढ होत चालली आहे.
Goa Cancer Deaths
Goa Cancer CasesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यात दरवर्षी कॅन्‍सरचे रुग्‍ण आणि त्‍यामुळे होणाऱ्या मृतांच्‍या संख्‍येत वाढ होत चालली आहे. २०२१ ते २०२५ या कालावधीत राज्‍यात दिवसाला सरासरी तिघांचा कॅन्‍सरने मृत्‍यू झाल्‍याचे केंद्रीय आरोग्‍य राज्‍यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्‍यसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.

२०२१ ते २०२५ या पाच वर्षांच्‍या काळात राज्‍यात ८,६८७ कॅन्‍सरग्रस्‍तांची नोंद झाली. यातून दिवसाला सरासरी पाच रुग्‍ण सापडत असल्‍याचे दिसून येते. तर, याच पाच वर्षांच्‍या काळात कॅन्‍सरमुळे ४,७६२ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला असून, यातून दिवसाला सरासरी तिघांचा मृत्‍यू होत असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. मंत्री जाधव यांनी सादर केलेल्‍या आकडेवारीतून या पाचही वर्षांच्‍या काळात कॅन्‍सर रुग्‍णांत आणि कॅन्‍सरमुळे होणाऱ्या मृतांच्‍या संख्‍येत वाढ होत असल्‍याचे समोर आले आहे.

Goa Cancer Deaths
फुफ्फुसाचा कॅन्सर रोखण्‍यासाठी 'AI'ची साथ; गेल्‍या काही महिन्‍यांत 1 लाखाहून अधिक तपासण्या; 20 रुग्णांवर उपचार, आरोग्‍यमंत्र्यांची माहिती

दरम्‍यान, गोव्‍यासह इतर राज्‍यांमध्‍येही कॅन्‍सरग्रस्‍त आणि मृतांच्‍या संख्‍येत वाढ होत असल्‍याचे दिसून येत आहे. त्‍यावर नियंत्रण आणण्‍यासाठी आरोग्‍य मंत्रालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) असंसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रम (एनपी-एनसीडी) राबवून देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तांत्रिक व आर्थिक साहाय्य पुरवण्‍यास सुरुवात केली आहे.

या कार्यक्रमामुळे पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, मनुष्यबळ विकास, तपासणी, लवकर निदान आणि तत्‍काळ उपचारांना गती मिळाली आहे. याशिवाय देशभरातील जिल्हा रुग्णालयांमध्ये ५२४ ‘डे केअर कॅन्सर सेंटर्स’ची कार्यरत आहेत. ‘सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा’ या उपक्रमाचा भाग म्हणून ‘एनपी-एनसीडी’अंतर्गत तोंड, स्तन आणि गर्भाशय कॅन्‍सरसंदर्भातील चाचण्‍यांना वेग देण्‍यात आला असून, त्‍याअंतर्गत ३० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व व्यक्तींची आरोग्य केंद्रांवर तपासणी केली जात असल्‍याचेही मंत्री जाधव यांनी नमूद केले आहे.

Goa Cancer Deaths
Goa healthcare policy: महागडे उपचार आता सर्वांसाठी परवडणार; दुर्मिळ आजारांवरील औषधांसाठी राज्यात 'अभिनव किंमत' धोरण राबवण्याची सरकारची घोषणा

२ महिन्‍यांत कॅन्‍सर रजिस्‍ट्री

गोव्यात कॅन्‍सरला ‘अधिसूचित आजार’ म्‍हणून जाहीर करून त्‍याबाबतची रजिस्‍ट्री तयार करण्‍याची मागणी सरकारने मंजूर केली असून, पुढील दोन महिन्‍यांत ती पूर्ण होईल. त्‍यानंतर प्रत्‍येक तालुक्‍यातील नागरिकांच्‍या आरोग्‍य चाचणी केली जाणार आहे, असेही अधिकारी संदेश मडकईकर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com