फुफ्फुसाचा कॅन्सर रोखण्‍यासाठी 'AI'ची साथ; गेल्‍या काही महिन्‍यांत 1 लाखाहून अधिक तपासण्या; 20 रुग्णांवर उपचार, आरोग्‍यमंत्र्यांची माहिती

Goa AI lung cancer screening: ॲस्ट्राझेनेका आणि क्यूर.एआय यांच्या सहकार्याने गेल्‍या काही महिन्‍यांत संपूर्ण राज्‍यभरातील एक लाखाहून अधिक रुग्णांच्‍या छातीच्‍या एक्‍सरेची ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे तपासणी करण्‍यात आली.
Goa AI lung cancer screening
Goa AI lung cancer screeningDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ॲस्ट्राझेनेका आणि क्यूर.एआय यांच्या सहकार्याने गेल्‍या काही महिन्‍यांत संपूर्ण राज्‍यभरातील एक लाखाहून अधिक रुग्णांच्‍या छातीच्‍या एक्‍सरेची ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे तपासणी करण्‍यात आली.

त्यापैकी १,६०० जणांमध्ये फुफ्फुसाच्‍या कॅन्‍सरची संशयास्‍पद लक्षणे आढळून आली, तर २० रुग्णांना प्रत्यक्ष फुफ्फुसाच्या कॅन्सरचे निदान झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे निदानाचा वेळ ५० टक्‍क्‍यांहून अधिक कमी झाला आहे, असे आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी स्‍पष्‍ट केले.

Goa AI lung cancer screening
Goa Cyber Crime: गुंतवणूकीतून ज्यादा परताव्याचं आमिष, गोव्यातील एकाला 67 लाखांचा गंडा; केरळच्या भामट्याला बेड्या

पणजीत मंगळवारी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आरोग्‍य संचालक डॉ. रूपा नाईक आणि इतर डॉक्‍टर उपस्‍थित होते. राज्यात विविध प्रकारच्या कॅन्सरग्रस्त रुग्णांवर योग्य पद्धतीने आणि तत्काळ उपचार सुरू असल्याचे राणे यांनी सांगितले. फुफ्फुसाच्या कॅन्सरचे निदान होण्यास दीर्घ कालावधी लागत असल्याने अनेकदा रुग्णांना कॅन्सरची लागण झाल्याचे उशिरा समजत होते.

परिणामी योग्यवेळी उपचार सुरू करता येत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन फुफ्फुसाच्या कॅन्सरची लागण झालेल्या रुग्णांची लवकर ओळख पटावी, त्यांच्यावर वेळेत उपचार व्हावेत आणि अधिकाधिक जीव वाचावेत, यासाठी आरोग्य खात्याने एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. सध्या बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयासह राज्यातील १७ आरोग्य केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Goa AI lung cancer screening
Goa Tax Share: गोव्‍याला कराच्‍या वाट्यातून मिळतील 5570 कोटी रुपये! CM सावंतांची स्पष्टोक्ती; ‘कुशावती’साठी 500 कोटींची तरतूद

दोन लाख तपासण्‍यांचा निर्धार : ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून फुफ्फुसाच्या कॅन्सरचे निदान करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या उपक्रमाचा आणखी विस्तार करून दोन लाखांहून अधिक तपासण्या करण्याचे ध्‍येय आरोग्‍य खात्‍याने ठेवल्‍याचेही मंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी नमूद केले.

टर्शरी कॅन्‍सर इस्‍पितळ २०२७ पर्यंत कार्यान्‍वित

टाटा मेमोरियलच्‍या सहकार्याने बांबोळी येथे उभारण्‍यात येत असलेल्‍या टर्शरी कॅन्‍सर इस्‍पितळाचे काम अंतिम टप्‍प्‍यात आले आहे. २०२७ पर्यंत काम पूर्ण करून हे इस्‍पितळ सुरू करण्‍यात येईल. त्‍याचा गोमंतकीय जनतेला मोठा फायदा होणार असल्‍याचा विश्‍‍वासही मंत्री राणे यांनी व्‍यक्त केला.

डॉक्‍टरांवरील ताण होणार बराच कमी : गोवा बनणार मॉडेल राज्य

‘एआय’ तंत्रज्ञानामुळे कॅन्‍सरचे निदान लवकर होऊन रुग्‍णांना तत्‍काळ उपचार मिळतील. त्‍यामुळे त्‍यांचे प्राणही वाचतील.

'एआय’चा वापर भविष्‍यात आणखी वाढवून सर्वच प्रकारच्‍या कॅन्‍सरवर नियंत्रण आणण्‍याचे आरोग्‍य खात्‍याचे प्रयत्‍न.

या तंत्रज्ञानामुळे गोमेकॉ तसेच इतर इस्‍पितळांत कॅन्‍सर विभागात काम करणाऱ्या डॉक्‍टरांवरील कामाचा ताणही होणार कमी. ४. एआय तंत्रज्ञानाचा वापर हे आरोग्‍य क्षेत्राच्‍या दृष्‍टीने महत्त्‍वपूर्ण पाऊल.

आरोग्‍य क्षेत्रात गोव्‍याला मॉडेल राज्‍य बनविण्‍याचा आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांचा संकल्‍प.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com