Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Goa Police: गोवा पोलिसांची नवी मोहीम! परप्रांतीय भाडेकरूंची तपासणी सुरू, माहिती न दिल्यास...

दोनशे कामगारांच्या कागदपत्रांची पडताळणी, वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अलर्टमोडवर
Published on

Goa Police राज्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कळंगुट पोलिसांनी या भागात वास्तव्य करून राहणाऱ्या परप्रांतीय भाडेकरूंची कडक तपासणी मोहीम सुरू केली आहे.

मंगळवारपासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत चारशेहून अधिक देशी भाडेकरूंच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याचे कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक परेश नाईक यांनी दै. ‘गोमन्तक’ला सांगितले.

या मोहिमेत सहभागी पोलिस कर्मचाऱ्यांकडून योग्य कागदपत्रांविना वास्तव्य करून राहणाऱ्या दोनशे परप्रांतीय कामगारांचे सुरक्षेच्यादृष्टीने फॉर्म भरून घेण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी दिली.

कळंगुट पाठोपाठ कांदोळीत परप्रांतीयांचा मोठा भरणा असलेल्या आराडी येथील परिसरात सर्वात मोठी मोहीम राबविताना घराघरांत जाऊन तेथे वास्तव्यास असलेल्या भाडेकरूंची कागदपत्रे तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची नोंद करून घेण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले.

Goa Police
Ferry Boat Services: चोडण-रायबंदर फेरीबोटीचा प्रश्न काही सुटेना, वारंवार नादुरूस्तपणाने प्रवाशांत संताप

परप्रांतीय भाडेकरूंची कागदपत्रे तसेच त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्याचा धडाका सध्या कळंगुट पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. या गोष्टीचे आम्ही समर्थन करतो.

अशा मोहिमा एक दोन दिवसांसाठी न राबवता त्या अधूनमधून सुरू ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून या भागातील वाढत्या गुन्हेगारी वृत्तीस वेळीच चाप बसेल. स्थानिक पंचायत मंडळाकडून पोलिसांना वेळोवेळी सहकार्य दिले जाईल.

- जोजेफ सिक्वेरा, सरपंच, कळंगुट

Goa Police
Sonsodo Dump: सोनसडो कचऱ्याला पुन्हा आग, सहा महिन्यांत चौथ्यांदा घडली घटना

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीस कोण जबाबदार आहेत ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या मोहिमा वेळोवेळी घेण्याबरोबरच कागदपत्रांविना राज्यात वास्तव्य करून राहणाऱ्या लोकांसाठी नियमित पोलिसी कारवाईचा भाग असावा.

- प्रेमानंद दिवकर, कळंगुट फोरम

पोलिसांकडून सुरू करण्यात आलेल्या अशा कारवायांचे आम्ही निश्चितच स्वागत करतो. मात्र, पोटापाण्यासाठी या भागात उतरलेल्या कामगारवर्गाचा पोलिसांनी अशा कारवाया करताना सहानुभूतीने विचार करावा, परंतु गुन्हेगारांना दयामाया दाखवू नये.

- मायकल लोबो, आमदार

Goa Police
अपघाताने कुटुंब हिरावलं, पैशाची चणचण, जमीनदाराचा जाच, मोरजीतील सिंथिया जगतेय हालाखीचं आयुष्य

अन्यथा कारवाई...

या मोहिमेदरम्यान योग्य कागदपत्रांविना या भागात भाडेकरू म्हणून वास्तव्य करून राहणाऱ्या अनेकांना एक दोन दिवसात कागदपत्रे सादर करण्याची सक्त ताकीद देण्यात आली असून अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com