Sadetod Nayak : ''व्याघ्र प्रकल्पालाबाबत राजकारण्यांची सोयीची भूमिका; 'यासाठीच' केला जातोय विरोध'', तज्ञांनी व्यक्त केलं मत

सडेतोड नायक : सत्तरीत वनही नको आणि वाघही नको, ही राजकारण्यांची सोयीची भूमिका
Sadetod Nayak
Sadetod NayakDainik Gomantak

Sadetod Nayak : राज्याचे भौगोलिक क्षेत्र 3 हजार 702 चौरस किलोमीटर त्यापैकी 186 चौरस किलोमीटर क्षेत्र खाणींसाठी दिले गेले आहे, एवढे क्षेत्र कशासाठी देण्यात आले, ही चिंतेची बाब आहे. खाण व्यवसाय कसल्याही परिस्थितीत सरकारला चालू करायचा आहे, त्यासाठीच सरकारी पातळीवर व्याघ्र प्रकल्पाला विरोध होत आहे.

सत्तरी तालुक्यात कित्येक पिढ्या राहतात, यापूर्वी वाघाच्याविरोधी त्यांनी कधी आवाज काढलेला नाही, पण आत्ताच वाघाला विरोध का? असा सवाल पर्यावरणप्रेमी रमेश गावस यांनी व्यक्त केला.

‘गोमन्तक’ टीव्हीवरील संपादक संचालक राजू नायक यांच्या सडेतोड नायक कार्यक्रमात ‘गोव्याला वाघाची गरज आहे का?’ या विषयावरील चर्चेत ते बोलत होते. त्यांच्याबरोबर सत्तरीतील करंझोळचे रहिवासी हरिश्‍चंद्र गावस यांचा सहभाग होता.

सत्तरीत पर्यावरण संवेदनशील क्षेत्र नको आहे, त्याशिवाय त्यांना वन आणि वाघही नको आहे. वाघाला विरोध का, त्यासाठी निकष काय लावलेत? सत्तरीत वनही नको आणि वाघही नको, अशी राजकारण्यांनी आपल्याला सोयीची मांडणी केल्याचे दिसते.

Sadetod Nayak
Goa Culture : गोव्यात काळ्याकुट्ट रात्रीच्या अंधारात पार पडणारा 'बनीरबाब विधी' माहितीये का?

आपल्याला अनेकजण विचारतात, गोवा लहान आहे तेथे व्याघ्र प्रकल्प कशासाठी? आपले म्हणणे असे आहे की, गोवा लहान आहे, म्हणूनच खाणवाल्यांनी एक किलोमीटरचा बफर झोन करून घेतला, याकडे लक्ष वेधत रमेश गावस म्हणतात, ३ हजार ७०२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी सहा टक्के म्हणजे १८६ चौरस किलोमीटर खाण क्षेत्र आहे.

तर मग एवढ्या लहान राज्याला १८६ चौरस किलोमीटर खाण क्षेत्र हे राज्याला उद्ध्वस्त करून टाकत आहे, ते कशासाठी हवे असा सवालही त्यांनी केला. याचा विचार कोणीही करीत नाही. एकदा तुम्ही वाघ नाकारले की, पुढे सगळी नैसर्गिक आपत्ती येण्याची भीती आपणास वाटते असेही त्यांनी नमूद केले.

वाघ हवा की माणूस हवा? या प्रश्‍नावर हरिश्‍चंद्र गावस म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत सत्तरीत आम्ही वास्तव्य करून आहोत. सत्तरीतील वाघ मारले गेले, याविषयावरील प्रश्‍नाला उत्तर देताना गावस म्हणतात, वनात राहणाऱ्या लोकांची जनावरे वाघाने मारली म्हणून त्यांनी त्याला मारले, त्यांनी जे कृत्य करायला नको होते, ते केले.

Sadetod Nayak
Goa G20 Summit : गोव्याला यजमानपद ; अक्षय ऊर्जा, शाश्वत विकासासाठी बैठक

करंझोळ गावाला पाचशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. आत्तापर्यंत या भागात वाघ दृष्टीस पडला नाही, पण पर्यावरणप्रेमींना तो पडतो. पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचे नाव न घेता गावस यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, त्यांनाच वाघ दृष्टीस पडतो. वाघ भटकंती करीत असतो.

सत्तरीत महापूर आला, त्याला वनक्षेत्र तोड कारणीभूत असल्याच्या कारणाला आपण आव्हान देतो, असे सांगत गावस म्हणतात, चाळीस वर्षे झाली, त्या डोंगरावर कोणी जात नाही. नको असलेली झाडे वनखात्याने लावलेली आहेत.

गतीने वाढणाऱ्या आणि हिरवाई दिसण्यासाठी लावलेल्या झाडांमुळे वन्यप्राण्यांना आवश्‍यक असणारे प्राणी खाद्य म्हणून मिळत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Sadetod Nayak
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील इंधनाच्या दरात किरकोळ बदल; वाचा आजचे दर

रमेश गावस म्हणतात...

राजकारण्यांना वनातील जमिनी खायच्या तर आहेतच, पण सर्वात जास्त म्हणजे खाणी सुरू करणे अधिक महत्त्वाचे त्यांना वाटते, असा मुद्दाही गावस यांनी मांडला. लोक व्याघ्र प्रकल्पावर काहीच बोलत नाहीत, या प्रश्‍नावर गावस सांगतात, काही जणांना वाघ हवा असेलही.

आजच्या स्थितीत लोक हे लोक राहिलेले नाहीत. ते आता मतदार झालेले आहेत. राजकारण्यांच्या मागे नाचणे हा त्यांचा कार्यभार झाला आहे. त्यामुळे त्यांना आपल्या जागेचे महत्त्व आणि महात्म्यही कळलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com