Goa Mining Auction: 'मेसर्स रॉयलाईन'कडून 12.68 लाखच मिळणार! खाण माल कमी असल्‍याचा कंपनीचा दावा मंत्रिमंडळाला मान्‍य

Goa Mining Auction Lease Claim: खाण लिलावात मेसर्स रॉयलाईन रिसोर्सेस प्रायव्‍हेट लिमिटेड या कंपनीने जो खाणपट्टा जिंकलेला होता.
Goa cabinet approves mining proposal
Goa cabinet approves mining proposalDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: खाण ई–लिलावात खाणपट्टा जिंकलेल्‍या ‘मेसर्स रॉयलाईन रिसोर्सेस प्रायव्‍हेट लिमिटेड’ या कंपनीला संबंधित पट्ट्यात खनिज माल कमी मिळाल्‍याने या कंपनीकडून निर्धारित सुमारे ६.५० कोटींपैकी केवळ १२ लाख रुपयेच घेण्‍याचा निर्णय राज्‍य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

खाण लिलावात मेसर्स रॉयलाईन रिसोर्सेस प्रायव्‍हेट लिमिटेड या कंपनीने जो खाणपट्टा जिंकलेला होता, त्‍यासाठी कंपनीने खाण खात्‍याला सुमारे ६.४५ कोटी देण्‍याचे निश्‍चित केलेले होते. परंतु, माल हाताळत असताना तो सुमारे ६.३२ कोटीच्‍या रकमेइतकाही नसल्‍याचे समोर आले. त्‍यामुळे या कंपनीने खाण खात्‍याकडे नुकसान भरपाई देण्‍याचा किंवा मूळ रकमेतून ६.३२ कोटींची रक्कम कमी करण्‍याचा दावा केलेला होता.

Goa cabinet approves mining proposal
Mulgao mining: मुळगावात खाणविरोधातील लढा संघटितपणे तीव्र करण्याचा निर्धार; जाहीर सभेत गावकऱ्यांची वज्रमूठ!

मंत्रिमंडळात विषय चर्चेत

काही दिवसांपूर्वी झालेल्‍या राज्‍य मंत्रिमंडळाच्‍या बैठकीत हा विषय चर्चेला आलेला होता. त्‍यात मेसर्स रॉयलाईन रिसोर्सेस प्रायव्‍हेट लिमिटेडच्‍या दाव्‍यानुसार कंपनीकडून केवळ १२.६८ लाख रुपयेच घेण्‍यास मंजुरी देण्‍यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Mining
Goa Cabinet Expansion Updates
Goa Cabinet Expansion Updates
 JBR Stone Private Limited
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com